मान्सून महाराष्ट्रभर!

By admin | Published: June 21, 2016 03:55 AM2016-06-21T03:55:48+5:302016-06-21T03:55:48+5:30

चोरपावलाने महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सून सोमवारी मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात दाखल झाला आहे. मान्सूनचा अजून म्हणावा तसा जोर नसला तरी सरींवर सरी

Monsoon across Maharashtra! | मान्सून महाराष्ट्रभर!

मान्सून महाराष्ट्रभर!

Next

पुणे : चोरपावलाने महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सून सोमवारी मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात दाखल झाला आहे. मान्सूनचा अजून म्हणावा तसा जोर नसला तरी सरींवर सरी पडत असल्याने अवघे समाजमन आनंदून गेल्याचे सुखद चित्र पहायला मिळत आहे.
मराठवाडा, विदर्भाच्या उर्वरित भागातही काळ््या ढगांची दाटी होऊ लागली आहे. येणारे चार दिवस मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
अंदाजापेक्षा जवळपास १० दिवस उशिरा मान्सून राज्यात दाखल झाला. नेहमी कोकणमार्गे येणारा मान्सून यंदा विदर्भमार्गे दाखल झाला आहे.
त्यामुळे सलामीलाच धो...धो...कोसळणाऱ्या मान्सूनचे स्वरुप बदलले आहे. बहुतांश ठिकाणी भिजपाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर नसताच शिडकावा होत आहे. परंतु कोकणातील काही भागात तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद येथे मुसळधार पाऊस झाला आहे.
सोमवारी दिवसभरात मुंबईत २४ मिमी, पुणे ़०़९, जळगाव ३, महाबळेश्वर १, नाशिक ७, अलिबाग १३, पणजी ६, औरंगाबाद १, अकोला ४ मिमी पाऊस झाला आहे़ कोकणातील रोहा येथे १७७ मिमी पावसाची नोंद झाली़
तसेच मुरुड, तळा ११०, माणगाव येथे प्रत्येकी ८०, मराठवाड्यात माजलगाव, उस्मानाबाद, पाटोदा प्रत्येकी ७०, सुधागड, पाली, जामखेड, परतूर येथे ६० मिमी पावसाची नोंद झाली़ (प्रतिनिधी)

Web Title: Monsoon across Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.