मान्सूनचे आगमन लांबणार

By Admin | Published: June 5, 2017 10:30 PM2017-06-05T22:30:38+5:302017-06-05T22:30:38+5:30

केरळला नेहमीपेक्षा एक दिवस ३० मेला आलेल्या मॉन्सूनला पश्चिमेकडील शुष्क वा-याच्या दबावामुळे पुढे प्रगती होऊ शकली नाही़

Monsoon arrival will be delayed | मान्सूनचे आगमन लांबणार

मान्सूनचे आगमन लांबणार

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 - केरळला नेहमीपेक्षा एक दिवस ३० मेला आलेल्या मॉन्सूनला पश्चिमेकडील शुष्क वा-याच्या दबावामुळे पुढे प्रगती होऊ शकली नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेता येत्या ३ ते ४ दिवसात राज्यात मॉन्सून येण्याची शक्यता दिसून येत नाही. पश्चिम बंगालच्या उपसागरात आलेल्या मोरा चक्रीवादळामुळे सर्व बाष्प इशान्यकडे खेचले गेल्याने मॉन्सूनच्या पश्चिम शाखेची पुढील वाटचाल रोखली गेली आहे. 
केरळला आलेल्या मॉन्सूनने अजून संपूर्ण केरळ, तामिळनाडू अद्याप पूर्णपणे व्यापला नसून येत्या ३ ते ४ दिवसात कर्नाटक, तामिळनाडू, रायलसिमा आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागात मॉन्सूनच्या प्रवेशाच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
मॉन्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर तो पुढील वाटचाल वेगाने करेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती़ त्याच दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात मोरा चक्रीवादळ निर्माण झाले़ त्यामुळे मॉन्सूनच्या ईशान्य शाखेने बांगला देश, म्यानमार व ईशान्यकडील राज्यात धडक मारली होती़ मात्र, ईशान्य शाखेचीही २ जूननंतर प्रगती थांबलेली आहे़ 
सर्वसाधारणपणे मॉन्सून ५ जूनपर्यंत कर्नाटकाची किनारपट्टी, कारवार, गदग, हैदराबाद, विशाखापट्टम, पश्चिम बंगालचा उपसागर, बांगला देशातील ढाक्कापर्यंत मजल मारत असतो़ पण, यंदा लवकर येऊनही त्याची प्रगती केरळच्या काळी भागापर्यंतच झालेली आहे़ 
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले तरी त्याच्या पुढील प्रगतीसाठी आवश्यक असे हवामानात बदल घडून आले नाही़ सौदी अरेबिया व त्या परिसरातील वाळवंटी भागातून येणाºया शुष्क वाºयांचा दबाव जास्त आहे़ संपूर्ण उत्तर भारत अशा वाºयांनी व्यापला आहे़ आकाशात ढग आहेत पण, या वाºयांमुळे त्यात वाढ होऊन  पाऊस पडू शकत नाही़ यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे़ पश्चिम भागात चक्राकार गती निर्माण झाली असली तरी वाळवंटी प्रदेशातून येणाºया वाºयांचा जोर जास्त असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे़ 
राज्यात पाऊस येत्या २४ तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ 
७ ते ९ जून दरम्यान कोकण, गोवा व मराठवाड्यात बºयाच ठिकाणी व मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़  
 
मान्सून लहरीच -
राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये मॉन्सूनचे आगमन लांबत चालले आहे़  पुण्यात साधारणपणे ७ जूनला मॉन्सून येतो असे आजवर मानले जात आले आहे़ गेल्या वर्षी २०१६ मध्ये पुण्यात मॉन्सूनचे आगमन २० जूनला झाले होते तर, २०१५ मध्ये १२ जूनला आला होता़ २०१४ मध्ये १५ जूनला त्याचे आगमन झाले होते़ फक्त २०१३ मध्ये तो बरोबर ८ जूनला आला होता़

Web Title: Monsoon arrival will be delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.