Monsoon 2018: महाराष्ट्रात मान्सून दाखल, 24 तासात येणार मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 01:42 PM2018-06-08T13:42:49+5:302018-06-08T13:42:49+5:30

येत्या 24 तासात मान्सून मुंबईत धडकणार आहे.

monsoon arrived in maharashtra | Monsoon 2018: महाराष्ट्रात मान्सून दाखल, 24 तासात येणार मुंबईत

Monsoon 2018: महाराष्ट्रात मान्सून दाखल, 24 तासात येणार मुंबईत

Next

मुंबई- उकाड्याने हैराण झालेले सर्वच पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पावसाची ही प्रतिक्षा आता संपली असून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. येत्या 24 तासात मान्सून मुंबईत धडकणार आहे. गेल्या दोन दिवसापासून कोकणासह मुंबईत तुरळक पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला होता. मंगळवारी सकाळी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आणि लगेचच संपूर्ण राज्यात स्थिरावला आहे, 

दरम्यान, हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 7 जून ते सोमवार 11 जून या कालावधीत राज्यात विशेषत: कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ७ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता होती. शुक्रवार, ८ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून, वर्तविण्यात आली आहे.

शनिवार, ९ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. १० व ११ जून रोजी मुंबईसह कोकणात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केलं आहे. 
 

Web Title: monsoon arrived in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.