मान्सूनचा विलंब..शेतकऱ्यांची धडकी भरविणारा...!  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 06:32 PM2019-05-15T18:32:17+5:302019-05-15T18:48:02+5:30

दुष्काळात होरपळत असलेल्या व पाणीटंचाई ग्रासलेल्या देशवासियांच्या चिंतेत भर घालणारा अंदाज बुधवारी हवामान विभागाने वर्तविला आहे़.

Monsoon Delay ...not good for farmer ...! | मान्सूनचा विलंब..शेतकऱ्यांची धडकी भरविणारा...!  

मान्सूनचा विलंब..शेतकऱ्यांची धडकी भरविणारा...!  

Next
ठळक मुद्देकेरळमध्ये ५ दिवस उशिरा येणार : ६ जूनला आगमन मान्सून दाखल होण्यापूर्वी तो जवळपास १५ दिवस अगोदर अंदमानात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी हवामान विभागाकडून ६ घटकांचा विचार

पुणे : दुष्काळात होरपळत असलेल्या व पाणीटंचाई ग्रासलेल्या देशवासियांच्या चिंतेत भर घालणारा अंदाज बुधवारी हवामान विभागाने वर्तविला आहे़. मॉन्सून यंदा ५ दिवस उशिरा ६ जून रोजी केरळ दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे़. स्कायमेटने मंगळवारी मान्सूनचे आगमन ४ जून रोजी होईल असा अंदाज व्यक्त केला होता़. मान्सून मॉडेलनुसार त्यात चार दिवस पुढे मागे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे़.  
साधारणपणे ३० मे ते १ जून ही केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख गृहीत धरली जाते़. अल निनोचा प्रभाव असल्याने यंदा मान्सूनवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता़. हवामान विभागाने आज जाहीर केलेल्या अंदाजातून ते प्रतित होत आहे़. याअगोदर हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे़. 
मान्सून आगमानाबद्दलचे १४ वर्षातील १३ अंदाज खरे ठरल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे़. केवळ २०१५ मध्ये अंदाज चुकला होता़. २०१५ मध्ये हवामान विभागाने ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये येईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. मात्र, मान्सून ५ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता़. 
केरळमधील मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी हवामान विभागाकडून  ६ घटकांचा विचार केला जातो़. उत्तर- पश्चिम भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपसमूह, दक्षिण भारतातील पूर्व मॉन्सून पाऊस, दक्षिण चीन सागरावरील उष्णतेचे होणारे उत्सर्जन, दक्षिणपूर्व भारतीय महासागरावरील वाऱ्यांची दिशा, पूर्वेकडील भूमध्य सागरीय भागावरील उष्णतेचे होणारे उत्सर्जन, दक्षिण -पश्चिम पॅसिफिक क्षेत्रावरील उष्णतेचे होणारे उत्सर्जन अशा सहा घटनांचा विचार करुन केरळमध्ये मॉन्सून कधी येणार याचा अंदाज जाहीर केला जातो़. 
केरळमध्ये मान्सून दाखल होण्यापूर्वी तो जवळपास १५ दिवस अगोदर त्याचे अंदमानच्या समुद्रात आगमन होत असते़. दरवर्षी साधारण १५ ते १६ मे दरम्यान मान्सूनचे आगमन अंदमानच्या समुद्राजवळ होत असते़. यंदा मात्र, अंदमानच्या समुद्रातील काही भाग निकोबार बेट आणि परिसरात १८ -१९ मे रोजी मान्सून दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे़. 
़़़़़़़़़़
मागील पाच वर्षातील केरळमधील मान्सूनचे आगमन
वर्ष        प्रत्यक्ष आगमन    हवामान विभागाचा अंदाज
२०१४    ६ जून        ५ जून
२०१५    ५ जून        ३० मे
२०१६    ८ जून        ७ जून
२०१७    ३० मे        ३० मे
२०१८    २९ मे        २९ मे
२०१९            ६ जून
़़़़़़़़़़़़़़

Web Title: Monsoon Delay ...not good for farmer ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.