मान्सून मुंबईत दाखल

By admin | Published: June 13, 2015 03:26 AM2015-06-13T03:26:38+5:302015-06-13T03:26:38+5:30

‘अशोबा’ वादळाच्या अडथळ्यांमुळे रत्नागिरीत थांबलेला मान्सून शुक्रवारी(१२ जून) अखेर मुंबईत दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे

Monsoon filed in Mumbai | मान्सून मुंबईत दाखल

मान्सून मुंबईत दाखल

Next

मुंबई : ‘अशोबा’ वादळाच्या अडथळ्यांमुळे रत्नागिरीत थांबलेला मान्सून शुक्रवारी(१२ जून) अखेर मुंबईत दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. शिवाय मुंबईसह पुणे, सातारा आणि कोल्हापूरामध्ये मान्सून दाखल झाला आहे. पुढील २४ तासांसाठी कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.
मान्सूनपूर्व पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली होती. त्यानंतर लगेचच म्हणजेच गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळीही मुंबई शहरासह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. शहर आणि पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक होते. नरिमन पॉईंट, फोर्ट, भायखळा, लालबाग, गिरगाव, वरळी, दादर, सायन, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली, मीरा, भाईंदर या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. (प्रतिनिधी)

Web Title: Monsoon filed in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.