राज्यात १० ते १२ जूनपर्यंत मान्सून
By admin | Published: June 2, 2016 03:12 AM2016-06-02T03:12:17+5:302016-06-02T03:12:17+5:30
नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल आतापर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात झाली असून, पुढील २ ते ३ दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व पूर्व मध्य बंगालच्या
मान्सूनच्या वाटचालीस परिस्थिती अनुकूल
पुणे : नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल आतापर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात झाली असून, पुढील २ ते ३ दिवसांत
दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत होण्यास मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे़ त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या जनतेला लवकरच दिलासा मिळणार आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली, तर कोकण-गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़
पुढील दोन दिवसांत राज्याच्या तुरळक भागांत पाऊस पडण्याची शक्यता असून, ४ व ५ जूनला दक्षिण कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत, तर राज्यात उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ पुणे व परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़
राज्यातील प्रमुख शहरांतील
कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ३७़७, जळगाव ४१़४,
कोल्हापूर ३५़८, महाबळेश्वर ३०़७, मालेगाव ४१़२, नाशिक ३७़२, सांगली ३८़४, सातारा ३७़६, सोलापूर ४०़१, मुंबई ३५, अलिबाग ३३़४, रत्नागिरी ३६़२, पणजी ३५़२, डहाणू ३४, औरंगाबाद ४०, परभणी ४३़१, नांदेड ४२़५, अकोला ४२़६, अमरावती ४२़८, ब्रह्मपुरी ३९़५, चंद्रपूर ४४़८,
गोंदिया ४३़५, नागपूर ४५़८, वर्धा ४५़५, यवतमाळ ४२़८़
यावर्षी महाराष्ट्रामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस पडणार आहे़ मान्सूनचे केरळमध्ये ७ जूनला आगमन होणार आहे़ महाराष्ट्रामध्ये येत्या १० ते १२ जूनपर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी सांगितले़