मान्सून केरळात दाखल!

By admin | Published: June 7, 2014 01:00 AM2014-06-07T01:00:39+5:302014-06-07T01:00:39+5:30

केव्हाची प्रतीक्षा लागलेल्या मान्सूनचे अखेर शुक्रवारी केरळात दमदार आगमन झाले आहे.

Monsoon lapsed in Kerala! | मान्सून केरळात दाखल!

मान्सून केरळात दाखल!

Next
>देशात दमदार आगमन : महाराष्ट्रात येण्यास अजून आठवडा 
मुंबई : केव्हाची प्रतीक्षा लागलेल्या मान्सूनचे अखेर शुक्रवारी केरळात दमदार आगमन झाले आहे. त्याचा प्रवास वेगाने सुरू असला तरी महाराष्ट्रात दाखल होण्यास निदान त्याला आठवडाभराचा अवधी लागेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
केरळात दाखल झालेल्या मान्सूनने शुक्रवारी दक्षिण अरबी समुद्र आणि केरळचा बराचसा भाग, मालदीव-कॉमोरिनचा 
उर्वरित भाग, तामिळनाडूचा काही भाग, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागराचा बराचसा आणि दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. शिवाय पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, केरळचा उर्वरित भाग, दक्षिण कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. तसेच ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांत पुढील 24 तासांत मोसमी पाऊस दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. 
मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असला तरी मुळात केरळातच मान्सून उशिराने दाखल झाला आहे. परिणामी, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी आठवडाभराचा अवधी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जोर्पयत मान्सून समुद्रावर असतो; तोर्पयत मान्सूनचे पुढील अंदाज वर्तविणो हवामान खात्याला सोयीचे जाते. मात्र एकदा का मान्सून 
जमिनीवर दाखल झाला, की 
मान्सूनचा पुढील अंदाज वर्तविणो जिकिरीचे होऊन बसते, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
देशाच्या काही भागांत मागील दोन दिवसांपासून वादळी वा:यासह पावसाने हजेरी लावली आहे. 

Web Title: Monsoon lapsed in Kerala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.