Maharashtra Rain Live Updates : मुंबईला रेड अलर्ट! पुढील ४ ते ५ दिवस कोकण किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 08:38 AM2021-06-09T08:38:05+5:302021-06-09T15:21:41+5:30

मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली ...

Monsoon In Maharashtra: Mumbai, Navi Mumbai, Thane, Raigad Rain Live updates | Maharashtra Rain Live Updates : मुंबईला रेड अलर्ट! पुढील ४ ते ५ दिवस कोकण किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Live Updates : मुंबईला रेड अलर्ट! पुढील ४ ते ५ दिवस कोकण किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

Next

मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या फटका हा रस्ते वाहतुकीला बसला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी आवश्यक हवामान तयार झाल्याने मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 24 तासांत मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होईल, अशी शक्यता आहे. शिवाय येत्या काही दिवसांत कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.
 

LIVE

Get Latest Updates

03:51 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये जाऊन घेतला शहरातील पावसाळी परिस्थितीचा आढावा

03:48 PM

मुंबई - गुलमोहर मार्ग तसेच चुनाभट्टी बी.के.सी उड्डाणपुलाखाली गुडघाभर पाणी साचलं


 

03:45 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये; शहरातील पावसाचा आढावा घेण्याचं काम सुरू
 

03:20 PM

मुंबईला रेड अलर्ट! पुढील ४ ते ५ दिवस कोकण किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज


 

03:15 PM

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी का तुंबलं? पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणतात...

03:09 PM

Maharashtra Rain Live Updates : नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश

02:51 PM

पुढील तीन तास मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
 

02:50 PM

मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर पावसाचा थ्रिल... मुंबईकरांनी चालत्या ट्रेन मधून घेतला Imagica चा फिल

02:45 PM

पालघरमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांमध्ये पाणी साचलं

02:42 PM

ठाणे- विटावा पुलाखाली पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरू

02:32 PM

Mumbai Rains Updates : कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्याही सूचना

02:29 PM

हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील 3 दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

02:28 PM

ठाणे: दिवा आगासन मुख्य रस्ता पाण्यात; लोकांचे हाल

02:22 PM

अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश

पालघर - 9 जून ते 12 जून या कालावधीत पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून अलर्ट जारी करताना सोसाट्याचा वारा आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून नद्यांना येणारा पूर किंवा समुद्राला येणाऱ्या भरतीच्या काळात अधिक पाऊस झाल्यास काही भाग जलमय होण्याची शक्यता आहे तर काही भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश जारी केले आहेत

02:13 PM

पालघर जिल्ह्यात अलर्ट! 9 ते 12 जूनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पालघर -  राज्यात मोसमी पावसाच्या मंदावलेल्या वेगाने पुन्हा वेग घेतल्याने पालघर जिल्ह्यात आज सकाळ पासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचे पाहावयास मिळाले. 12 जूनपर्यंत जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह, मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

02:10 PM

राज्यातील पावसाची आजपर्यंतची वाटचाल...; मुंबई, पालघर, ठाणे आणि नागपूरपर्यंत मान्सूनचे आगमन

02:03 PM

ठाणे : श्रीरंग सोसायटी येथे पाणी साचण्यास सुरुवात.
 

01:57 PM

मुंबईत मुसळधार पाऊस; परळ, हिंदमाता परिसरात साचलं पाणी; वाहतूक विस्कळीत

01:48 PM

ठाणे: सावरकर नगर येथे पंचामृत अपार्टमेंटची भिंत पडून अनेक गाड्यांचं नुकसान

01:44 PM

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हता, पण चार ते पाच तासांत पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था नक्कीच केलीय; महापौर पेडणेकरांचं विधान.

01:39 PM

चुनाभट्टी येथे रेल्वे रुळांवर साचलं पाणी (व्हिडीओ - सुशील कदम)


 

01:19 PM

मुंबईत एका तासात ६० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस; पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची माहिती

01:18 PM

महापौरांनी शहरातील परिस्थितीचा घेतला आढावा

01:16 PM

नाशिक : सकाळपासून ढग दाटून आल्यानंतर शहरात मान्सून सरींचा वर्षावाला सुरुवात.

01:13 PM

महापौर किशोरी पेडणेकर यांची महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट

01:12 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील एकूण पाऊस व सद्यस्थिती जाणून घेतली. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त( पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे उपस्थित होत्या.
 

01:10 PM

टिळक नगर आणि कुर्ला स्थानकांदरम्यान रुळावर साचलं पाणी

01:06 PM

क्रांती नगरमधील रहिवाशांच्या घरात आणि घराच्या परिसरात पाणी साचले

कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजार येथील मिठी नदी लगत असलेल्या क्रांतीनगर परिसरात नाल्यांची साफसफाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात क्रांती नगरमधील रहिवाशांच्या घरात आणि घराच्या परिसरात पाणी साचले आहे.
 

01:04 PM

मुंबई महानगरपालिका आयुक्त पाहणी करणार

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे आजच्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात म्हणजे दुपारी १.१५ वाजता हिंदमाता आणि गांधी मार्केट परिसराची व तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

12:55 PM

पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपलं; रेल्वे रुळावर पाणी साचलं...मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेलाही लागला ब्रेक

12:49 PM

मुंबईत मुसळधार पाऊस; सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर परिणाम; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

12:41 PM

सांताक्रुझ वेधशाळेत 102 मिलिमीटर पावसाची नोंद

बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून साडेअकरा वाजेपर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत 102 मिलिमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे.

- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग

12:38 PM

ठाणे शहरात पावसाचा जोर वाढला

ठाणे - ठाणे शहरात पावसाचा जोर वाढला, ठाण्यातील मुख्य बाजार पेठ या ठिकाणी पाणी साचले होते.

12:37 PM

पहिल्याच पावसात रेल्वेची ही अवस्था

पहिल्याच पावसात रेल्वेची ही अवस्था. पाऊस आज चालू झाला नाही तर लगेचच ट्रॅकमध्ये पाणी भरणे, सिग्नल यंत्रणा बंद पडणे रेल्वेच्या बाजूला असलेले नाले साफ न करणे पावसाळ्या पूर्वी जी काम व्हायला हवी होती ती न झाल्यामुळे व सक्षम यंत्रणा न राबवल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे आता तर पावसाची ही सुरुवात आहे अजून पूर्ण पावसाळा बाकी आहे तर रेल्वे प्रशासन अतिशय बेजबाबदारपणे काम करत आहे आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. आता तरी रेल्वे प्रशासन जागा होईल का ... आणि प्रवाशांना न्याय मिळेल का??
- सुधाकर पतंगराव (सचिव), ठाणे रेल्वे प्रवाशी संघटना
 

12:36 PM

VIDEO: नागरिकांच्या घरात पाणी घुसले; दिव्यातील नालेसफाईचा पहिल्याच पावसात पंचनामा

12:30 PM

दिवा- पहिल्याच पावसात पाणी घरांमध्ये शिरल्यानं नागरिक त्रस्त

12:27 PM

रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट; 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

12:23 PM

पुढील ४ तास पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी

12:19 PM

Mumbai Rains Updates : पहिल्याच पावसात मुंबापुरीतल्या लोकलपासून बेस्टसह उर्वरित यंत्रणा कोलमडली


 

12:03 PM

मुसळधार पावसामुळे सायन-कुर्ल्यादरम्यान पाणी साचलं; सीएसएमटी-ठाणे लोकल सेवा ठप्प

11:42 AM

लोकल सेवेला मुसळधार पावसाचा फटका; हार्बर मार्गावरील सीएसएमटी-वाशी दरम्यानची लोकल सेवा ठप्प

11:38 AM

किंग सर्कल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर येथील हिंदमाता आणि माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात पहिल्याच पावसात पाणी साचण्यास सुरुवात.

11:29 AM

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, सखल भागांमध्ये साचले पाणी


 

11:22 AM

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43 पूर्णांक 35 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 127.475 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
 

11:20 AM

मुंबई - मुसळधार पावसामुळे दृश्यमानतेवर परिणाम; पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंदावली

11:08 AM

मुंबई: मुसळधार पावसामुळे सायन-जीटीबी नगर रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचलं; कुर्ला-सीएसएमटी रेल्वे स्थानकांदरम्यानची सेवा ठप्प

10:54 AM

मुंबईत मुसळधार पाऊस; कुर्ला, सायन रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

10:50 AM

ठाण्यातही पावसाची जोरदार हजेरी (फोटो - विशाल हळदे)

10:47 AM

मुंबईच्या दिशेने जाताना कोपरी चेक नाक्यावर काही प्रमाणात पावसामुळे वाहतूक कोंडी

10:17 AM

Maharashtra Rain Live Updates : देवगडमध्येही सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

10:03 AM

पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला

10:03 AM

ठाण्यात पावसाचा वेग थोडा ओसरला (व्हिडीओ - विशाल हळदे)

09:45 AM

रायगड परिसरात तीन दिवस जोरदार अतिवृष्टीचा इशारा

पनवेल - पनवेल परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रायगड परिसरात तीन दिवस जोरदार अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
 

09:23 AM

ठाण्यात 8 वाजेपर्यंत 22.61 मिमी पावसाची नोंद

ठाणे - ठाणे शहरात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात. सकाळी पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले होते. अनलॉकमुळे दुकान सुरू झाली असली तरी आज तिसऱ्या दिवशी पावसामुळे या दुकानांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. सकाळी 8 वाजेपर्यंत 22.61 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

09:13 AM

मान्सून एक दिवस आधीच मुंबईत दाखल; शहरात मुसळधार पाऊस


08:53 AM

डोंबिवली - पहाटेपासून पावसाचा जोर कायम, सकाळी 8.45 दरम्यान काहीसा कमी झाला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून चाकरमान्यांची गैरसोय झाली असल्याचे दिसून आले. रेल्वे, रस्ता वाहतूक सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 

08:49 AM

ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस

08:44 AM

मुंबईमध्ये पावसाची जोरदार हजेरी

08:42 AM

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 

08:41 AM

कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. 
 

08:40 AM

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे.
 

Web Title: Monsoon In Maharashtra: Mumbai, Navi Mumbai, Thane, Raigad Rain Live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.