मान्सून पुन्हा सक्रिय
By admin | Published: August 5, 2014 03:14 AM2014-08-05T03:14:57+5:302014-08-05T03:14:57+5:30
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने गेल्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली.
Next
पुणो : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने गेल्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली. सर्वाधिक 18क् मिमी पाऊस शहापूरमध्ये पडला. येत्या 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम भागाकडे सरकले असून त्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात गुजरात ते केरळ राज्यांच्या किनारपट्टीवर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत माथेरान, भिरा, कर्जत, भिवंडी, अंबरनाथ, इगतपुरी, महाबळेश्वर, उल्हासनगर, कल्याण, वसई, पनवेल, ठाणो, साकोली, आमगाव, सडक अजरुनी येथे मुसळधार पाऊस पडला.
घाटमाथ्यांवरही मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे. ताम्हिणी घाटात 21क् मिमी, अम्बोणो व दावडी घाटात 16क्, कोयना व डुंगरवाडी घाटात 14क्, शिरगाव घाटात 11क्, भिरा घाटात 1क्क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
मराठवाडय़ात मात्र पावसाने ओढ दिली आहे. सोमवारीदेखील मराठवाडा कोरडाच राहिला. मात्र, पुढील 48 तासांत मराठवाडय़ात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
24 तासांत राज्यात पाऊस
(मिमीमध्ये)
माथेरान 15क्, मुरबाड 11क्, भिरा 1क्क्, कर्जत 1क्क्, साकोली 1क्क्, भिवंडी 9क्, अंबरनाथ 9क्, इगतपुरी 9क्, आमगाव 9क्, उल्हासनगर 8क्, कल्याण 8क्, सडक अजरुनी 8क्, वसई 7क्, पनवेल 7क्, ठाणो 7क्, महाबळेश्वर 7क्, विक्रमगड 6क्, पालघर 6क्, लाखणी 6क्, पाली 5क्, गगनबावडा 5क्, भंडारा 5क्, चिपळूण 4क्, पोलादपूर 4क्, रोहा 3क्, मुंबई 3क्, गुहागर 3क्, कणकवली 3क्, महाड 3क्, शाहुवाडी 3क्, संगमेश्वर 2क्, दापोली 2क्, डहाणू 2क्, रत्नागिरी 2क्, पेण 2क्, सावंतवाडी 2क्, मुरूड 2क्, हण्रे 2क्, पुणो 2क्, पन्हाळा 2क्, राधानगरी 2क्, पाटण 2क्, गडचिरोली 2क्, o्रीवर्धन 1क्, अलिबाग 1क्, वेंगुर्ला 1क्, मालवण 1क्, शिराळा 1क्, सिन्नर 1क्, सातारा 1क्, गोंदिया 1क्, रामटेक 1क़्