Monsoon Session: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव; नामांतराचा ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:45 IST2022-08-25T15:33:41+5:302022-08-25T15:45:15+5:30
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि.बा. पाटील असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे.

Monsoon Session: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव; नामांतराचा ठराव मंजूर
मुंबई: तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि मुंबईतील विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला होता. पण, शिंदे सरकार आल्यानंतर हा निर्णय स्थगित करण्यात आला. पण, आता अधिवेशनात नव्याने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत तीन प्रस्ताव मांडले, ते प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. यात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आले आहे. तसेच, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि.बा. पाटील असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंचा निर्णय
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मनाबादच्या नामकरणाचा निर्णय घेतला. पण, नंतर शिंदे सरकारने हा ठराव बेकायदेशीररीत्या मांडल्याचा ठपका ठेवून निर्णयाला स्थगिती दिली. पण, आता नव्याने या प्रस्तांना मंजुरी देण्यात आली आहे.