संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून
By admin | Published: June 25, 2017 01:09 AM2017-06-25T01:09:03+5:302017-06-25T01:09:03+5:30
संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुुलैपासून सुुरू होणार आहे. याच दिवशी राष्ट्रपतिपदासाठीचे मतदान होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज होणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुुलैपासून सुुरू होणार आहे. याच दिवशी राष्ट्रपतिपदासाठीचे मतदान होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज होणार नाही.
तीन आठवड्यांचे अधिवेशन ११ आॅगस्ट रोजी संपणार आहे. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला. जुलैच्या सुरुवातीला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील.
१७ जुलै रोजी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर, भाजपाकडून लगेच उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराची निवड होऊ शकते. नव्या उपराष्ट्रपतींना १० आॅगस्टपर्यंत शपथ देण्यात येणार आहे, तर अधिवेशन ११ आॅगस्टपर्यंत चालेल. राष्ट्रपती निवड होणार असल्याचे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़