पावसाळी अधिवेशन २४ जुलैपासून

By Admin | Published: July 12, 2017 04:58 AM2017-07-12T04:58:30+5:302017-07-12T04:58:30+5:30

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन २४ जुलैपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन १९ दिवस म्हणजे ११ आॅगस्टपर्यंत चालेल.

The monsoon session will begin on July 24 | पावसाळी अधिवेशन २४ जुलैपासून

पावसाळी अधिवेशन २४ जुलैपासून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन २४ जुलैपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन १९ दिवस म्हणजे ११ आॅगस्टपर्यंत चालेल. अधिवेशनात चार सुट्ट्यांचे दिवस असून, कामकाजाचे १५ दिवस असतील, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी विधानसभा कामकाज ठरविताना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह विधानसभेतील पक्षांचे गटनेते व वरिष्ठ सभासद उपस्थित होते. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे कामकाज ठरविताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विधान परिषदेतील सर्व पक्षांचे गटनेते, वरिष्ठ सभासद उपस्थित होते.
शनिवार, २९ जुलै रोजी कामकाज होणार नाही; तर रविवार, ३० जुलै आणि ६ आॅगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असणार आहे. सोमवार, ७ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनामुळे कामकाज होणार नाही. त्याऐवजी शनिवार, ५ आॅगस्ट रोजी कामकाज सुरू राहणार आहे.

Web Title: The monsoon session will begin on July 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.