यंदा कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर मॉन्सूनने दाखविली अधिक 'कृपादृष्टी'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 07:32 PM2020-09-30T19:32:26+5:302020-09-30T19:37:00+5:30
राज्यात यंदा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला..
पुणे : यंदा मॉन्सूनने विदर्भ वगळता महाराष्ट्रावर अधिक कृपादृष्टी दाखविली असून मॉन्सूनच्या चार महिन्यात राज्यात तब्बल १६ टक्के अधिक वर्षा झाली आहे.त्याचवेळी विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी केवळ बुलढाणा, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. तसेच देशभरात यंदा सरासरीच्या तुलनेत ९ टक्के आणि पाऊस झाला आहे.
राज्यात यंदा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. जुलैमध्ये पावसाने थोडी ओढ दिली होती. नेहमी दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या मराठवाड्यात यंदा मे महिन्यापासूूनच पावसाने साथ दिली आहे. बंगालच्या उपसागरात यंदा कमी दाबाचे क्षेत्र कमी वेळा तयार झाल्याने त्याचा फटका विदर्भासह पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणाला बसला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरुवातीपासून पाऊसमान कमी होते. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. हे बहुदा प्रथमच घडत आहे.
राज्यात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : अहमदनगर ७६, मुंबई उपनगर ६७, औरंगाबाद ६४,
अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : मुंबई शहर ५८, सिंधुदुर्ग ५३, रत्नागिरी २४, धुळे ४७, पुणे ४०, जळगाव २४, कोल्हापूर २३, जालना ३९, सांगली २६, सोलापूर २५, बीड ४६, लातूर २९, उस्मानाबाद २३, सोलापूर २५
सर्वसाधारण पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : पालघर १३, रायगड १५, ठाणे १८,ख नंदुरबार १०, नाशिक १९, सातारा ६, हिंगोली ८, नांदेड ८, परभणी १९, बुलढाणा ५, नागपूर ७, वाशिम १६
सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : अकोला -२७, अमरावती -२०, भंडारा -४, चंद्रपूर -१८, गडचिरोली, गोंदिया, वर्धा प्रत्येकी -८, यवतमाळ -२४़
़़़़़
राज्यातील विभागवार चार महिन्यात पडलेला पाऊस (मिमी)
विभाग प्रत्यक्ष पडलेला पाऊस सरासरी पाऊस फरक
कोकण ३६६२ २८७५ २७
मध्य महाराष्ट्र ९६६ ७५१ २९
मराठवाडा ८६६ ६६८ ३०
विदर्भ ८५१ ९४३ -१०
़़़़़़़
देशभरात ९ टक्के अधिक वर्षा
देशभरात यंदा सरासरीच्या तुलनेत ९ टक्के आणि पाऊस झाला आहे. देशभरातील ३६ हवामान विभागापैकी ५ विभागात सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून अधिक कमी पाऊस झाला आहे. त्यात धान्याचे कोठार म्हटल्या जाणाऱ्या पंजाब, हरियाणा,चंदीगडमध्ये -१४ टक्के, पश्चिम उत्तर प्रदेश -३७, उत्तराखंड -२०, जम्मू काश्मीर -३४, हिमाचल प्रदेश -२६ टक्के कमी पाऊस झाला आहे. दक्षिण भारतात सर्वाधिक २९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य भारतात १५ टक्के अधिक पाऊस झाला आहे.