मान्सूनचा मुक्काम अंदमानातच
By admin | Published: May 24, 2017 02:30 AM2017-05-24T02:30:32+5:302017-05-24T02:30:32+5:30
नेहमीपेक्षा आधी पोहोचलेला मान्सून गेल्या सहादिवसापासून अंदमानच्या समुद्रातच मुक्काम ठोकून आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नेहमीपेक्षा आधी पोहोचलेला मान्सून गेल्या सहादिवसापासून अंदमानच्या समुद्रातच मुक्काम ठोकून आहे़ आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर चक्रावात असल्याने नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल पुढील ७२ तासात नैऋत्य, आग्नेय व पूर्व, मध्य, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात होण्यास स्थिती अनुकूल आहे़ येत्या २४ तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़
विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे़ मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार करु लागला आहे़ मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला़ विदर्भात अनेक शहरातील कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़
अकोला, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ येथील रात्रीच्या तापमान ३० अंशाच्या वर गेले असून अन्य ठिकाणचे ही किमान तापमान त्याच्या जवळपास आहे़ विदर्भवासींना गरम रात्रीचा अनुभव येत आहे़ पुण्यात पुन्हा कमाल तापमान ४० अंशाचा आकडा पार केला आहे़