मान्सून १५ मेपर्यंत दक्षिण अंदमानात

By Admin | Published: May 11, 2017 03:02 AM2017-05-11T03:02:21+5:302017-05-11T03:02:21+5:30

नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल होण्यास पोषकस्थिती निर्माण होत असून मान्सून दक्षिण अंदमानाच्या समुद्रात आणि निकोबार बेटाच्या परिसरात

Monsoon till 15 May in South Andaman | मान्सून १५ मेपर्यंत दक्षिण अंदमानात

मान्सून १५ मेपर्यंत दक्षिण अंदमानात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल होण्यास पोषकस्थिती निर्माण होत असून मान्सून दक्षिण अंदमानाच्या समुद्रात आणि निकोबार बेटाच्या परिसरात येत्या १५ मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़
सध्या कडाक्याच्याच्या उन्हाने अवघा देश होळपळून निघत असताना हवामान विभागाने ही आनंदाची बातमी दिली आहे़
गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने यंदा मान्सून ९६ टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते़ त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़
सर्वसाधारणपणे दक्षिण पश्चिम मान्सूनचे आगमन २० मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते़ त्यानंतर
२५ मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकापासून म्यानमारपर्यंत आगमन होते़ त्यानंतर १ जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो़ त्यात काही वेळा पुढे मागे होतात. आताची पोषकस्थिती लक्षात घेता दरवर्षीपेक्षा साधारण ५
दिवस लवकर मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता आहे़. त्याची पुढील वाटचाल कशी असेल यावर तो केरळला आणि महाराष्ट्रात कधी पोहोचेल, हे समजून येईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील वाटचाल महत्त्वाची!
आपल्याकडे अंदमान बेटानजिक १५ ते २० मेच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होत असते़ त्यात ४-५ दिवसांचा फरक असतो़ हे लक्षात घेता त्याला उशीर न होता, तो वेळेवर येत असल्याचे संकेत आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत़
पुढील १० ते १५ दिवसांत त्याची वाटचाल कशी होते आणि त्याचे केरळला कधी आगमन होते, याकडे आता आपले लक्ष राहील़ केरळला मान्सूनचे आगमन कधी होईल, याचा अंदाज व्यक्त करताना १५ मेपर्यंतची स्थिती कशी आहे, हे लक्षात घेतली जाते़ सध्या तरी मान्सून वेळेवर येत असल्याचे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे़
- डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

Web Title: Monsoon till 15 May in South Andaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.