Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 08:36 AM2024-05-16T08:36:46+5:302024-05-16T08:41:54+5:30

Monsoon Update : हवामान विभागाने मान्सून बाबत आणखी एक अपडेट दिली आहे.

Monsoon Update rain latest news When will monsoon come in Kerala? update given by Meteorological department | Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली

Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली

Monsoon Update ( Marathi News ) : मे महिन्याची १५ तारीख संपल्यानंतर सर्वांना मान्सूनबाबत उत्सुकता लागलेली असते. मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. काही दिवसापूर्वी हवामान विभागाने मान्सूनबाबत अपडेट दिली होती. आता आणखी एक नवीन अपडेट दिली आहे. या वर्षी मान्सूनची सुरूवात लवकर होऊ शकते. हवामान विभागाने तारीखही जाहीर केली आहे. केरळमध्ये ३१ मे च्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतात १६ मे  आणि १८ मे पासून पूर्व भारतात उष्णतेची लाटेचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले

नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये येतो आणि त्याचे प्रमाण साधारण ७ दिवसांचे असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाचा नैऋत्य मान्सून ३१ तारखेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होऊ शकतो. चार दिवस कमी किंवा चार दिवस जास्त असा फरक असू शकतो. ही तारीख देशभरातील मान्सूनसाठी महत्त्वपूर्ण सूचक म्हणून काम करते. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. साधारणपणे २० ते २२ च्या सुमारास ते या झोनमध्ये प्रवेश करते. येथे पोहोचल्यानंतर मान्सून देशाच्या इतर भागांकडे सरकणार आहे. देशात अल निनो हवामान प्रणाली कमकुवत होत आहे. ला निना परिस्थिती सक्रिय होत आहेत. यंदा मान्सून चांगला होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वेळेपूर्वीच मान्सून भारतात येऊ शकतो, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी आसाम, मेघालय, त्रिपुरा, उप-हिमालय पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये उष्ण आणि दमट हवामान अपेक्षित आहे. पुढील चार दिवसांत, वायव्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात सुमारे ३-४ अंश सेल्सिअसने, मध्य भारत आणि गुजरातमध्ये सुमारे २-४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

 गुरुवारपासून उत्तर-पश्चिम भारतात आणि १८ मेपासून पूर्व भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, पंजाब, दक्षिण हरियाणा, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार, गुजरातच्या वेगळ्या भागात १६-१९ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. १५-१६ मे रोजी कोकणात, १६-१७ मे रोजी सौराष्ट्र आणि कच्छ, १८-१९ मे रोजी दिल्ली, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Monsoon Update rain latest news When will monsoon come in Kerala? update given by Meteorological department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.