८ मेपर्यंत राज्याला पावसाचा इशारा
By Admin | Published: May 5, 2016 01:53 AM2016-05-05T01:53:02+5:302016-05-05T01:53:02+5:30
देशासह राज्याच्या वातावरणात बदल नोंदवण्यात येत असतानाच ८ मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबई : देशासह राज्याच्या वातावरणात बदल नोंदवण्यात येत असतानाच ८ मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचप्रमाणे सध्या तापलेल्या मुंबईमधील हवामानही पुढील ४८ तासांसाठी ढगाळ राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे कमाल तापमानात वाढच होते आहे. राज्यातील शहरांचे सरासरी कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास नोंदवण्यात येत असून, ऊकाड्यातही वाढ झाली आहे.५ आणि ६ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ७ मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. (प्रतिनिधी)
पुण्यासाठी अंदाज
५, ६ आणि ७ मे - काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८, २० अंशावर राहील.
८, ९ आणि १० मे - आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३९, २१ अंशावर राहील.