मान्सून एक्स्प्रेस निघाली, १० जून रोजी महाराष्ट्रात पोहोचणार; हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 09:54 AM2021-05-22T09:54:46+5:302021-05-22T09:55:16+5:30

अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ आता पूर्णत: शमले आहे. मात्र, त्याचा प्रभाव म्हणून अजूनही मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे

Monsoon will reach Maharashtra on June 10; Weather account forecast | मान्सून एक्स्प्रेस निघाली, १० जून रोजी महाराष्ट्रात पोहोचणार; हवामान खात्याचा अंदाज

मान्सून एक्स्प्रेस निघाली, १० जून रोजी महाराष्ट्रात पोहोचणार; हवामान खात्याचा अंदाज

Next

मुंबई : मान्सूनने आता आपला प्रवास सुरू केला आहे. मान्सून २१ मे रोजी बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार बेट, अंदमानच्या समुद्राचा दक्षिण भाग आणि अंदमानच्या समुद्राच्या उत्तर भागात दाखल झाला. हवामानाने साथ दिली तरी मान्सूनचा पुढील प्रवास असाच वेगवान सुरू राहील आणि मान्सून १ जून रोजी केरळात, तर १० जून रोजी महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला.

अरबी समुद्रात उठलेले तौक्ते चक्रीवादळ आता पूर्णत: शमले आहे. मात्र, त्याचा प्रभाव म्हणून अजूनही मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या किंचित सरी कोसळत आहेत. शुक्रवारी ढगाळ हवामान आणि किंचित सरींचे प्रमाण कमी झाले होते आणि मुंबईत बऱ्यापैकी स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. आता पुन्हा एकदा हवामानात झालेल्या बदलामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून मुंबईकर रात्रीसह दिवसाही घामाघूम हाेत आहेत.

दरम्यान, पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात, दक्षिण पूर्व भागात, अंदमानचा संपूर्ण समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Web Title: Monsoon will reach Maharashtra on June 10; Weather account forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस