दीड महिना रखरखत्या उन्हात पत्नीसाठी खोदली विहीर!

By admin | Published: May 9, 2016 04:19 AM2016-05-09T04:19:52+5:302016-05-09T04:20:03+5:30

शेजाऱ्याने पत्नीला पाणी देण्यास नकार दिल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतमजुराने दीड महिना रखरखत्या उन्हाचे चटके सहन करत विहिर खोदली

A month and a half a day dug for a well-groomed wife! | दीड महिना रखरखत्या उन्हात पत्नीसाठी खोदली विहीर!

दीड महिना रखरखत्या उन्हात पत्नीसाठी खोदली विहीर!

Next

वाशिम,  विवेक चांदूरकर
शेजाऱ्याने पत्नीला पाणी देण्यास नकार दिल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतमजुराने दीड महिना रखरखत्या उन्हाचे चटके सहन करत विहिर खोदली. विशेष म्हणजे दुष्काळाने नैसर्गिक स्रोत आटत असताना अवघ्या १५ फुटांवर त्याला पाणी लागले. बिहारमधील ‘माऊंटन मॅन’ दशरथ मांझी याची आठवण करून देणारी ही घटना वाशिम जिल्ह्यात घडली. या ‘वेल मॅन’ने केवळ स्वत:साठीच नाही तर या विहिरीचे पाणी गावकऱ्यांनाही उपलब्ध करून दिले आहे. दुष्काळाचे चटके विदर्भालाही बसत असून वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर येथे पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.
आधी टिंगलटवाळी; आता आधार
विहीर खोदण्याचे कोणतेही तंत्र माहीत नसताना तसेच हाताशी पुरेशी साधनसमग्री उपलब्ध नसतानाही त्याने रखरखत्या उन्हाची पर्वा न करता, कामाला सुरुवात केली. गावातील इतर विहीरी आणि बोअर आटल्या असताना, बापुरावने सुरू केलेल्या खोदकामाची गावकऱ्यांनीच नव्हे, तर आप्तजनांनीही टिंगल केली; मात्र ते विचलीत झाले नाही. हा ध्येयवेडा शेतमजूर विहीर खोदूनच थांबला.
रस्ता तयार करण्यासाठी तब्बल २२ वर्षे घाम गाळून डोंगर पोखरणारा बिहारमधील माऊंटन मॅन दशरथ मांझी याची आठवण बापूराव ताजने याने सर्वांना करून दिली. आता संपूर्ण गाव त्यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी येते. बापूराव मात्र कुणालाही विरोध करीत नाही. एवढेच काय, पाण्याचा कुणाकडून ते मोबदलाही घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी गावात टिंगलटवाळीचा विषय झालेल्या बापुराव यांचा आता ग्रामस्थांना मोठा आधार झाला आहे. त्यांच्या विहीरीचे पाणी आता गावाची तहान भागवत आहे.
> पाण्यासाठी सर्वांना वणवण करावी लागत आहे. या लहानशा गावातील शेतमजुर बापूराव ताजणे याच्या पत्नीने शेजाऱ्याकडे पाणी मागितले; मात्र शेजाऱ्याने पाणी देण्यास नकार दिला. वस्तुत: अडीअडचणीच्या काळात मानवतेचे दर्शन घडत असते. पण इथे ताजणे कुटुंबीयांना वेगळा अनुभव आला. हा नकार बापुरावच्या जिव्हारी लागला अन् यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्याने स्वत:च विहिर खोदण्याचा निर्धार केला.

Web Title: A month and a half a day dug for a well-groomed wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.