छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:45 AM2022-06-16T05:45:02+5:302022-06-16T05:45:32+5:30

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे.

monument of Chhatrapati Sambhaji Maharaj Chief Minister Thackeray announcement | छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा 

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा 

googlenewsNext

मुंबई :

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. 

शिरूर तालुक्यातील वढू (बु.) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री  ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खा. डॉ. अमोल कोल्हे (दूरदृश्य प्रणालीद्वारे ) आ. अशोक पवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

भीमा - भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी हे स्मारक साकारण्यात येणार आहे. स्मारक परिसरात भव्य शिल्प, ॲम्फिथिएटर, प्रवेशद्वार, इमारत, घाट, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, पायाभूत सुविधांतर्गत पाण्याच्या टाक्या, विद्युतीकरण, सौरऊर्जा पॅनल, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. 

Web Title: monument of Chhatrapati Sambhaji Maharaj Chief Minister Thackeray announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.