मुंबईत मुसळधार; एका दिवसात 10 दिवसांचा पाणीसाठा
By admin | Published: July 3, 2016 07:09 PM2016-07-03T19:09:15+5:302016-07-03T19:09:15+5:30
गेल्या दोन दिवसात तलाव क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे तलावांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. 1 जुलै रोजी तलावामधे 1 लाख 10 हजार 619 मिलीलिटर पाण्याचा साठा जमा होता
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ : गेल्या दोन दिवसात तलाव क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे तलावांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. 1 जुलै रोजी तलावामधे 1 लाख 10 हजार 619 मिलीलिटर पाण्याचा साठा जमा होता. 2 जुलैला 1 लाख 19 हजार 259 मिलीलिटर इतक्या पाण्याच्या साठ्याची नोंद झाली होती.
3 जुलै रोजी सकाळी 6 वाजता 1 लाख 57 हजार 467 मिलीलिटर इतक्या पाणी असल्याची नोंद झाली आहे. एका दिवसात ३८ हजार २०८ मिलीलिटर इतका पाणी साठा वाढला आहे. 3 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच्या नोंदी प्रमाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर तलावात 78.00 मिलीलिटर, तानसा तलावात 97.60मिलीलिटर, विहार तलावात 207.00 मिलीलिटर, तुलसी तलावात 194.00 मिलीलिटर, अप्पर वैतरणा तलावात 64.00 मिलीलिटर, भातसातलावात 163.00 मिलीलिटर तर मध्य वैतरणा तलावात86.60 मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईला दररोज 3750 दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. 2 जुलैला पडलेल्या पावसाने एका दिवसात 10 दिवसाचा पाणी साठा वाढला आहे.