मुंबईच्या डबेवाल्यांच्या डिलिव्हरीला मिळणार मोपेडची जोड
By admin | Published: January 28, 2016 09:27 AM2016-01-28T09:27:42+5:302016-01-28T09:27:42+5:30
व्यवस्थापन कौशल्यासाठी जगभरात दखल घेतलेले मुंबईचे डबेवाले आता वेगवान डिलीव्हरीसाठी केवळ सायकलचा नाही तर मोपेडचा वापर करणार आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - व्यवस्थापन कौशल्यासाठी जगभरात दखल घेतलेले मुंबईचे डबेवाले आता वेगवान डिलीव्हरीसाठी केवळ सायकलचा नाही तर मोपेडचा वापर करणार आहेत. नवी मुंबईतल्या भेरवनाथ पतपेढीने मोपेड खरेदीसाठी कर्ज देऊ केले असून त्यामुळे हे आता शक्य होणार आहे.
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, डबेवाल्यांसाठी टीव्हीएसने खास मोपेड तयार केली असून त्यावरुन एकाचवेळी 50 डबे नेता येणार आहेत. याशिवाय आता हे डबेवाले ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या वस्तू पोहोचवण्याची जबाबदारी जोडधंदा म्हणून उचलणार आहेत असंही एबीपीनं म्हटलं आहे.
डबेवाल्यांच्या व्यवसायाला आता नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत. एकीकडे वाढती स्पर्धा आणि दुसरीकडे ग्राहकांची सेवा या दोन्हीचा तोल साधण्यासाठी मुंबईचे ऐतिहासिक डबेवाले आता आधुनिक होताना दिसत आहेत.