तळीरामांचा कामोठे वसाहतीकडे ‘मोर्चा’

By admin | Published: April 6, 2017 02:36 AM2017-04-06T02:36:19+5:302017-04-06T02:36:19+5:30

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतमधील पनवेल परिसरातील बीअर बार, वाईन शॉप बंद झाले

'Morcha' for Pahalas' Kamutha colony | तळीरामांचा कामोठे वसाहतीकडे ‘मोर्चा’

तळीरामांचा कामोठे वसाहतीकडे ‘मोर्चा’

Next

अरुणकुमार मेहत्रे,
कळंबोली- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतमधील पनवेल परिसरातील बीअर बार, वाईन शॉप बंद झाले आहेत. त्यामुळे नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, पनवेलमधील तळीरामांचा मोर्चा गेल्या एक-दोन दिवसांपासून कामोठे वसाहतीकडे वळताना दिसत आहे. या नोडमध्ये पाचशे मीटरच्या बाहेर असलेल्या तीन-चार बारचे शटर उघडे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
न्यायालयाच्या निर्देशाचा सर्वाधिक फटका पनवेलला बसला आहे. याचे कारण म्हणजे, या परिसरातून पनवेल-सायन, मुंबई- पुणे, एनएच ४ बी, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग जातो. या व्यतिरिक्त राज्य महामार्गाचाही समावेश आहे. पनवेलसह सिडको वसाहती या महामार्गाच्या बाजूला विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा फटका शहराबाहेरील महामार्गाच्या बाजूच्या तसेच शहरातील दारूच्या दुकानांना बसला आहे. नवीन पनवेलचा विचार केला, तर राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४, माथेरान रस्ता, तसेच द्रुतगती महामार्ग लगत असल्याने येथील जवळपास सर्वच बार आणि वाईनशॉपला टाळे लागले आहेत. खांदा वसाहतीमध्येही तीच स्थिती असल्याने बार आणि इतर दारू दुकानांचे शटर डाऊन झाले आहे. कळंबोली नोडही मुंब्रा आणि पनवेल-सायन महामार्गालगत आहे. त्यामुळे पाचशे मीटर अंतरावरील सर्व बार बंद झाले आहेत. फक्त दोन वाईनशॉप सुरू असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे.
कोपरा येथील अजित पॅलेसमधील दारू विक्र ी बंद झाली असल्याने खारघर परिसर दारूमुक्त झाले आहे; परंतु कामोठे वसाहतीचा परीघ मोठा असल्याने एनएच ४ बी आणि पनवेल-सायन महामार्गापासून पाचशे मीटरपेक्षा दूरवर असणारे पाच बीअरबार मात्र न्यायालयाच्या आदेशातून वाचले आहेत. त्याचबरोबर दोन वाईनशॉपने पाचशे मीटरचे अंतर ओलांडले आहे. त्यामुळे कामोठे नोडमध्ये तुलनेत आता जास्त बार सुरू आहेत. त्यामुळे कामोठेसह नवीन पनवेल, पनवेल, कळंबोली, आणि खारघरमधील तळीराम दारू पिण्याकरिता सायंकाळी वसाहतीत येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बारमध्ये कमालीची गर्दी उसळत आहे.
कळंबोलीतील दारुड्यांचा वावर रोडावला
कळंबोली वसाहतीत मुंब्रा-पनवेल महामार्गाला लागून असलेले वाईनशॉप आता बंद झाले आहेत. या ठिकाणी पूर्वी महामार्गालगत दारूच्या बाटल्या घेऊन दारूडे दारू पीत असत. सायंकाळच्या सुमारास एकच गर्दी होत होती, त्यामुळे येथील रहिवाशांना याचा त्रास होत होता. त्याचबरोबर आजूबाजूच्या दुकानदारांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत होते; परंतु हे वाईनशॉप बंद झाल्याने आता याठिकाणची गर्दी कमी झालेली आहे.
अतिक्रमणावर कारवाई करा
कामोठे वसाहतीतील सेक्टर ६ ए येथे गोल्डन व्ह्यूअपार्टमेंटमध्ये सरोवर बीअर बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. या बारमधील दारुड्यांमुळे येथील रहिवासी त्रस्त झाले होते. पाचशे मीटरच्या आतमध्ये असलेले हे बीअरबार आता बंद झाले आहेत. मात्र रेस्टॉरंट चालू असून किचन अतिक्र मण केलेल्या जागेत आहे. आमचा सुंटीवाचून खोकला गेला खरा; परंतु सोसायटीच्या जागेवरील अतिक्र मणावर कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

Web Title: 'Morcha' for Pahalas' Kamutha colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.