राज्यात १४ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त; दिवसभरात १८० मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 09:29 AM2020-10-22T09:29:52+5:302020-10-22T09:30:01+5:30
राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ५७ हजार ८५२ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी दिवसभरात २३,३७१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोविडमुक्त झाले.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१ टक्के, तर मृत्युदर १९.४३ टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ५८ हजार ८५२ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ८,१४२ रुग्ण आढळले, तर १८० मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या १६ लाख १७ हजार ६५८ झाली असून बळींची संख्या ४२,६३३ आहे.
९१ ते १०० वयोगटातील २,८९२ ज्येष्ठ बाधित -
- राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ५७ हजार ८५२ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.
- चार वयोगटांतील रुग्णसंख्या दोन लाखांहून अधिक असून ३१ ते ४० वयोगटात ३ लाख ३७ हजार ७७७, ४१ ते ५० वयोगटात २ लाख ८४ हजार १९४, ५१ ते ६० वयोगटात २ लाख ५४ हजार २००, तर २१ ते ३० वयोगटात २ लाख ६८ हजार ५५ रुग्ण आहेत.
- ९१ ते १०० वयोगटातील २,८९२ ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग झाला.