वर्षात दीड लाखांहून अधिक चालक अपघातात मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:57 AM2019-11-20T10:57:24+5:302019-11-20T11:03:38+5:30
दरवर्षी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ
पुणे : वाहतूक नियमांचे पालन करून वाहन चालविणाऱ्यांच्या तुलनेत अद्याप बेकायदेशीरपणे वाहन चालवत अपघातास बळी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून यामुळे प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून शिस्तीचे पालन करण्याची गरज अपघाताची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येते. भारतात मागील वर्षी तब्बल १ लाख ५१ हजार ४१७ व्यक्तींचा वाहन अपघातात मृत्यू झाला असून ४ लाख ६९ हजार ४१८ व्यक्ती त्या अपघातांमध्ये गंभीर जखमी झाल्या आहेत. एकूण अपघातांची संख्या ४ लाख ६७ हजार ०४४
इतकी आहे.
सेव्ह लाइफ फाउंडेशनच्यावतीने २०१८ वर्षातील अपघात व अपघातातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याकरिता संस्थेने रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून यासंबंधीची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या आकडेवारीनुसार, २०१७ च्या तुलनेत अपघातात मृत्युमुखी पडणाºयांची संख्या ३५०० तर अपघातांची संख्या २ हजार १३० ने वाढली आहे. भारतात दिवसाला वाहतूक अपघातात ४१५ जणांचा मृत्यू तर १ हजार २८० अपघात होत आहेत. तसेच दरतासाला १७ जणांचा मृत्यू वाहन अपघातात होत असल्याची माहिती या अहवालातून पुढे आली आहे. सर्वाधिक अपघात होणाऱ्या राज्यांत तमिळनाडूचा क्रमांक वरचा असून १३ टक्के वाहन धडकेच्या तक्रारीची नोंद या राज्याच्या नावावर झाली आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश (११%), उत्तर प्रदेश (९.१%) यांचा क्रमांक आहे. तसेच रस्त्यावर वाहनधडक होऊन त्यात मृत्युमुखी पडल्याची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशात आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक असून महाराष्ट्रातील वाहनधडकेत मृत्युमुखी पडणाºयांची टक्केवारी ८.८ % एवढी आहे. वय वर्षे १८ ते ३५ या वयोगटात अपघाताचे प्रमाण व अपघातात मृत्युमुखी पडणाºयांची संख्या सर्वात जास्त आहे.
या वयोगटातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी ४८% असून त्यानंतर वय वर्षे ३५ ते ४५ (२१.६%), ४५ ते ६० वर्षे (१५.१%), ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक (६%) तर १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील अपघाताची टक्केवारी (६.६%) असल्याचे वाहतूक अहवालात नमुद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण लक्षणीय असून ५४ हजार ०४६ मृत्यु राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. तसेच राज्य महामार्ग ४० हजार ५८० मृत्यु तर इतर रस्त्यांवर ५६ हजार ७९१ मृत्यु झाल्याची नोंद वाहतूक विभागाकडून घेण्यात आली आहे.
.........
अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे स्त्री आणि पुरुष असे वर्गीकरण केले असता त्यात अपघातात सर्वाधिक प्रमाणात जीव गमावण्यात पुरुषांची संख्या १ लाख ३० हजार १४४ (८६%) इतकी आहे. त्या तुलनेत स्त्रियांची संख्या २१ हजार २७३ (१४%) एवढी आहे.
......
हेल्मेट परिधान न केल्यामुळे ४३ हजार ६१४ जणांना आपले प्राण गमवावे लागेल असून सीट बेल्ट न लावल्यामुळे २४ हजार ४३५ वाहनचालक मृत्युमुखी पडले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या मालगाड्यांमुळे जवळपास १२ टक्के वाहनचालकांना मृत्यू आला असून १० टक्के गाड्यांचा एकमेकांवर आदळल्याने अपघात घडला आहे.
........
हिट अँड रन या प्रकरणात एकूण ६९ हजार ८२२ तक्रारींची नोंद झाली. त्यात २८ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित ६१ हजार ९८८ जण त्या अपघातात जखमी झाले आहेत. या आकडेवारीची २०१७ च्या आकडेवारीशी तुलना केल्यास यंदा हिट अँड रनच्या तक्रारीत ७.१ टक्क्यांंनी वाढ झाली असून त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ११ % टक्क्यांनी वाढली आहे.
देशातील प्रमुख १५ राज्यांतील
अपघातांची आकडेवारी
राज्ये अपघात मृत्युमुखी
उत्तर प्रदेश 42568 22256
महाराष्ट्र 35717 13261
तमिळनाडू 63920 12216
कर्नाटक 41707 10990
मध्य प्रदेश 51397 10706
राजस्थान 21743 10320
गुजरात 18769 7996
आंध्र प्रदेश 24475 7556
बिहार 9600 6729
तेलंगणा 22230 6603
पश्चिम बंगाल 12705 5711
ओडिशा 11262 5315
हरियाणा 11238 5118
पंजाब 6428 4740
छत्तीसगढ 13864 4592
एकूण 387623 134109