सराईत घरफोड्यांकडून आणखी 16 लाखांचा ऐवज जप्त

By admin | Published: July 15, 2016 08:09 PM2016-07-15T20:09:47+5:302016-07-15T20:09:47+5:30

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलेल्या शिकलगर टोळीकडून आणखी 14 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले

More than 16 lakhs of rupees were seized from Saraiat Gharafod | सराईत घरफोड्यांकडून आणखी 16 लाखांचा ऐवज जप्त

सराईत घरफोड्यांकडून आणखी 16 लाखांचा ऐवज जप्त

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15 - गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलेल्या शिकलगर टोळीकडून आणखी 14 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून पोलिसांनी आणखी 15 लाख 92 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्यामध्ये परकीय चलनाचा समावेश आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती उपायुक्त पी.आर. पाटील आणि सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधाणी (वय 21), गोरखसिंग गागासिंग टाक (वय 26), लख्खनसिंग रजपूतसिंग दुधाणी (वय 26, तिघे रा. रामटेकडी) आणि किसमतसिंग रामसिंग भादा (वय 31, मुळ रा. बाबानगर, धुळे. सध्या रा. रामटेकडी) अशी आरोपींची नावे
आहेत. त्यांचा साथीदार विकीसिंग कल्याणी फरार आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी प्रमोद गायकवाड यांना खब-याने दिलेल्या माहितीवरुन अतिरीक्त आयुक्त सी.एच. वाकडे, उपायुक्त पी.आर. पाटील, सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करीत आरोपींना 7 जुलै रोजी जेरबंद केले होते.
न्यायालयामधून आरोपींची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात येत होता. स्वारगेट, खडक, मार्केटयार्ड, विश्रांतवाडी, कोरेगांव पार्क, येरवडा आणि अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी 14 ठिकाणी घरफोडया करून 42 तोळे वजनाचे सोन्याचे
दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने, 10 हजार रुपए, 100 अमेरिकन डॉलर्स, 600 ईरो, न्युझीलंडचे 35 डॉलर, अरब देशाचे 165 दिनार, सिंगापूरचे 55 डॉलर्स असा एकुण 15 लाख 92 हजार रूपयाचा ऐवज चोरून नेल्याचे निष्पन्न झाले होते. हा ऐवज
हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी अर्जुनसिंगवर तब्बल 30 गुन्हे दाखल आहेत.
-------------
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत महर्षीनगरमधील अंकुर पार्क सोसायटीमध्ये दोन आठवडयापुर्वी झालेली घरफोडी देखील आरोपींकडून उघडकीस आली आहे. आरोपींकडून यापुर्वी दोन चारचाकी वाहने आणि घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

Web Title: More than 16 lakhs of rupees were seized from Saraiat Gharafod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.