दोनशेहून अधिक जणांची चौकशी

By admin | Published: April 7, 2017 01:19 AM2017-04-07T01:19:29+5:302017-04-07T01:19:29+5:30

दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा

More than 200 inquiries | दोनशेहून अधिक जणांची चौकशी

दोनशेहून अधिक जणांची चौकशी

Next

लोणावळा : येथील आयएनएस शिवाजी समोरील एस पॉइंट येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा, अशी मागणी मयत युवक व युवतीच्या नातेवाइकांनी लोणावळा शहर पोलिसांकडे गुरुवारी केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार व संशयित तसेच मयत युवक व युवती यांचे मित्र-मैत्रिणी अशा दोनशेपेक्षा जास्त जणांची पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केली आहे.
सायबर सेल व गुन्हे प्रकटीकरणची टीम घटनेचा समांतर तांत्रिक तपास करत आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती न आल्याने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत. दुहेरी खून प्रकरणातील मयत विद्यार्थी सार्थक वाकचौरे याचे वडील दिलीप वाकचौरे, मामा श्याम वालझाडे, मिलिंद वालझाडे व इतर नातेवाईक तसेच मयत श्रुती डुंबरे हीचे मोठे चुलते संतोष डुंबरे, दुसरे चुलते आशिष डुंबरे, चुलत भाऊ राहुल डुंबरे व इतर नातेवाईक यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तपास अधिकारी चंद्रकांत जाधव व पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांची भेट घेतली.
ही घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी असून, पोलिसांनी याप्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावत आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी मयत सार्थक व श्रुती यांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ज्या ठिकाणी ही दुहेरी
खुनाची घटना घडली त्या ठिकाणालाही नातेवाइकांनी भेट दिली. सार्थक व श्रुती यांच्या खुनाच्या घटनेला चार दिवस झाले तरी पोलीस प्रशासनाच्या हाती काही ठोस पुरावे लागलेले नाहीत. (वार्ताहर)

Web Title: More than 200 inquiries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.