राज्यात ५० लाखाहून अधिक डिजिटल सातबारा उतारे पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 08:01 PM2019-03-02T20:01:55+5:302019-03-02T20:18:22+5:30

गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाची यंत्रणा पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या कामात व्यस्त असल्याने डिजिटल सातबारा उता-याच्या कामावर परिणाम झाला आहे. 

More than 50 lakh digital saat bara are completed in the state | राज्यात ५० लाखाहून अधिक डिजिटल सातबारा उतारे पूर्ण 

राज्यात ५० लाखाहून अधिक डिजिटल सातबारा उतारे पूर्ण 

googlenewsNext
ठळक मुद्देमहसूल विभागाच्या अधिका-यांवर इतर कामांची जबाबदारी आल्याने डिजिटल सातबारा उता-याचे काम रखडले दररोज १५ ते २० हजार डिजिटल सातबारा उतारे तयार केले जात होते.मात्र,ही संख्या आता ३ ते ४ हजारावरडिजिटल सातबारा उता-याची माहिती लवकरच क्लाऊडवर येणार

पुणे: महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला असून आत्तापर्यंत ५० लाख ८५ हजार २९७ डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही १ कोटी ५७ लाख ३ हजार २३३ उतारे डिजिटल स्वरुपात तयार करण्याचे काम शिल्लक आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाची यंत्रणा पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या कामात व्यस्त असल्याने डिजिटल सातबारा उता-याच्या कामावर परिणाम झाला आहे. 
सातबारा उतारे मिळण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना होणारा तलाठी कार्यालयाकडून त्रास कमी करण्यासाठी ई -फेरफार प्रक्रियेंतर्गत डिजिटल  सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी तलाठी कार्यालयात सातबारा उता-यामधील दुरूस्तीसाठी गाव पातळीवर उता-यांचे चावडी वाचन केले गेले. तसेच सक्षम अधिका-याकडे अर्ज करून उता-यातील दुरूस्तीसाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, तरीही अनेक शेतक-यांच्या सातबारा उता-यात काही तृटी दिसून येत होत्या. त्यामुळे महसूल विभागातर्फे दुरूस्तीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ मे २०१८ रोजी नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.मात्र, अद्याप सर्व जिल्ह्यातील डिजिटल सातबारा उता-यांचे काम पूर्ण झालेले नाही.महसूल विभागाच्या अधिका-यांवर इतर कामांची जबाबदारी आल्याने डिजिटल सातबारा उता-याचे काम रखडले आहे. दररोज १५ ते २० हजार डिजिटल सातबारा उतारे तयार केले जात होते.मात्र,ही संख्या आता ३ ते ४ हजारावर आली आहे.डिजिटल सातबारा उता-याची माहिती लवकरच क्लाऊडवर येणार आहे.त्यामुळे या कामास गती मिळेल,अशी शक्यता आहे.
---------------
डिजिटल सातबारा उता-याची आकडेवारी 
अकोला-२,९४,००० ,अमरावती-२,७३,११३, अहमदनगर-५,५०,४७९, उस्मानाबाद-२,७८,३१९, औरंगाबाद-३७,७२६,कोल्हापूर-१,९८,६०३,गडचिरोली-१,३७,४६७,गोंदिया-८२,१४२, चंद्रपूर-१,३७,४९६,जळगाव-४९,६४२,जालना-१,८३,५४९,ठाणे-५२,७५०, धुळे -४,०६३,नंदुरबार-३८,८१७,नांदेड-२६६,नागपूर-२,७३,२४९,नाशिक-२,३४,२३५,परभणी-५८,९०२,पालघर-३,१९६, पुणे-२,१७,२५३,बीड-२,००,४१२,बुलढाणा-२,५७,२७७,भंडारा-२,३३,४८५,यवतमाळ-२,८७,२३२,रायगड-२,८५,४६४,लातूर-८९,७९९,वर्धा-१,२०,९९३,वाशिम-१,३४,०३४,सांगली-२४,६०१,सातारा-२४,६५७, सोलापूर-२,१५,०१४, हिंगोली-१,०६,९९९,

Web Title: More than 50 lakh digital saat bara are completed in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.