पाच महिन्यात ५ हजारपेक्षा जास्त बळी
By admin | Published: October 16, 2016 10:31 PM2016-10-16T22:31:21+5:302016-10-16T22:31:21+5:30
राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - राज्यातील विविध रस्ते अपघातांत 2016 च्या जानेवारी ते मे महिन्यांत 5 हजारपेक्षा जास्त जणांचे बळी गेल्याची बाब समोर आली आहे. यात नाशिक, कोल्हापूर क्षेत्र आघाडीवर असल्याची माहिती आरटीओकडून उपलब्ध झाली. महत्वाची बाब म्हणजे बळींच्या संख्येपेक्षा जखमींची संख्या कितीतरी पटीने जास्त असून 16 हजार 312 जण जखमी आहेत.
दारु पिऊन वाहन चालविणे, जलद व बेदरकारपणे वाहन चालविणे याचबरोबर ओव्हरटेक केल्याने राज्यात सर्वाधिक अपघातांना तोंड द्यावे लागते. अपघात होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांकडून जनजागृतीही केली जाते. यासाठी महाविद्यालयांमध्ये मोहिम घेतानाच बॅनर किंवा हॉर्डिगव्दारेही संदेश दिले जातात. तरीही अपघात काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. 2015 मध्ये राज्यातील विविध अपघातांत 13 हजार 212 जणांचे बळी गेले होते. 2016 मधील जानेवारी ते मे महिन्यापर्यंत हाच आकडा 5 हजार 394 पर्यंत गेला आहे. नाशिक क्षेत्रातील अहमदनगर, धुळे, नंंदुरबार, जळगाव, नाशिक (ग्रामिण) 1 हजार 197 तर कोल्हापूर क्षेत्रातील कोल्हापूर, पुणे (ग्रामिण), सांगली, सातारा, सोलापूर (ग्रामिण)मध्ये 1 हजार 111 जणांचे बळी गेले असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ठाणे क्षेत्र, अमरावती क्षेत्र आणि नागपूर क्षेत्राचा नंबर लागतो. पाच महिन्यात मुंबई शहरात तर 222 जणांचा मृत्यू रस्ते अपघातांत झाला आहे.