दिलासादायक! राज्यात ५३ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 08:44 PM2021-05-14T20:44:29+5:302021-05-14T20:47:57+5:30
राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, सातत्यानं रुग्णसंख्येत होतेय घट
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत होती. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ५३,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांत ३९,९२३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ३९,९२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ५३,२४९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५३,०९,२१५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ४७,०७,९८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ५,१९,२५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८८.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Maharashtra reports 39,923 new #COVID19 cases, 53,249 discharges and 695 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) May 14, 2021
Total cases 53,09,215
Total recoveries 47,07,980
Death toll 79,552
Active cases 5,19,254 pic.twitter.com/ocYVBg7nV3
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 14, 2021
14th May, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1,657
Discharged Pts. (24 hrs) - 2,572
Total Recovered Pts. - 6,31,982
Overall Recovery Rate - 92%
Total Active Pts. - 37,656
Doubling Rate - 199 Days
Growth Rate (7 May - 13 May) - 0.34%#NaToCorona
मुंबईत कोरोनाचा आलेख खाली
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत १,६५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर २,५७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता ९२ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्या ३७,६५६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता १९९ दिवसांवर गेला आहे.