राज्यातील ५६ हजारांहून अधिक मुले शाळाबाह्य

By admin | Published: December 15, 2015 03:57 AM2015-12-15T03:57:38+5:302015-12-15T03:57:38+5:30

राज्यात ६५ हजार ७७४ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. खऱ्या गरजू मुलांचा शोध घेण्याबाबत शासन सकारात्मक असून शाळाबाह्य बालकांचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे

More than 56,000 children out of school are out of school | राज्यातील ५६ हजारांहून अधिक मुले शाळाबाह्य

राज्यातील ५६ हजारांहून अधिक मुले शाळाबाह्य

Next

नागपूर : राज्यात ६५ हजार ७७४ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. खऱ्या गरजू मुलांचा शोध घेण्याबाबत शासन सकारात्मक असून शाळाबाह्य बालकांचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत प्रकाश गजभिये, सुनील तटकरे, संजय दत्त इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
४ जुलै २०१५ रोजी शासनाने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम संपूर्ण राज्यभरात राबविली होती. शाळेबाहेरील बालकांना शाळेत आणणे व टिकवून ठेवणे याबाबत कार्यवाही करण्यासाठी व्यापक स्वरूपात योजना व आराखडा तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्था तसेच राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवक यांच्या मदतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे पुनर्सर्वेक्षण प्रस्तावित अहे. तसेच शाळाबाह्य बालकांना नियमित शाळेत प्रवेश देण्यात येईल, असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: More than 56,000 children out of school are out of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.