नॅशनल कझ्युमर हेल्पलाइनच्या संकेतस्थळावर दोन महिन्यांत ६८ हजारांहून अधिक तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:24 AM2018-04-16T04:24:29+5:302018-04-16T04:24:29+5:30

नॅशनल कझ्युमर हेल्पलाइनच्या संकेतस्थळावर विविध माध्यमांतून गेल्या दोन महिन्यांत तब्बल ६८ हजार २८० तक्रारींचा पाऊस पडला आहे. जानेवारी महिन्यात ३४ हजार ४२८ तक्रारी, तर फेब्रुवारी महिन्यात ३३ हजार ८५२ तक्रारी या संकेतस्थळावर दाखल झाल्यात आहेत.

More than 68 thousand complaints in the National Consumer Helpline website in two months | नॅशनल कझ्युमर हेल्पलाइनच्या संकेतस्थळावर दोन महिन्यांत ६८ हजारांहून अधिक तक्रारी

नॅशनल कझ्युमर हेल्पलाइनच्या संकेतस्थळावर दोन महिन्यांत ६८ हजारांहून अधिक तक्रारी

Next

मुंबई - नॅशनल कझ्युमर हेल्पलाइनच्या संकेतस्थळावर विविध माध्यमांतून गेल्या दोन महिन्यांत तब्बल ६८ हजार २८० तक्रारींचा पाऊस पडला आहे. जानेवारी महिन्यात ३४ हजार ४२८ तक्रारी, तर फेब्रुवारी महिन्यात ३३ हजार ८५२ तक्रारी या संकेतस्थळावर दाखल झाल्यात आहेत. विशेष बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत डोके वर काढलेल्या ई-कॉमर्स क्षेत्राविषयी सर्वाधिक तक्रारींची नोंद दोन्ही महिन्यांत दिसून आली आहे.
तक्रारींच्या अहवालानुसार, ई-कॉमर्सनंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अनुक्रमे दूरसंचार क्षेत्राबद्दल ५ हजार ८९७ तक्रारी आणि ५ हजार ७७६ तक्रारी दाखल झाल्या. त्या खालोखाल बँकिंग, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि एजन्सी सर्व्हिसेस या क्षेत्रांविषयी तक्रारी समोर आल्या आहेत. त्याचप्रमाणे, दोन्ही महिन्यांत उत्तर प्रदेश राज्यातून सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशमधून ४ हजार ९८३ तक्रारी, तर फेब्रुवारीत ४ हजार ९३३ तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर, दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थान यांचा समावेश आहे. या तक्रार निवारण व्यासपीठावर दरदिवशी सरासरी ८८ ग्राहक तक्रारी नोंदवितात.
तक्रारी करण्यात महिला ग्राहकांचे प्रमाण अत्यल्प दिसून आले आहे. दोन्ही महिन्यांत पुरुष ग्राहकांनी सोशल मीडिया, दूरध्वनी, ईमेल्स आणि एसएमएस अशा विविध माध्यमांतून तक्रारी केल्या आहेत. त्यात जानेवारीत ९२ टक्के पुरुषांनी व ८ टक्के महिलांनी तक्रारी नोंदविल्या, तर फेब्रुवारीत ९१ टक्के पुरुष व ९ टक्के महिलांनी तक्रारी केल्या आहेत. यांपैकी दोन्ही महिन्यांतील ३१ हजार ८२१ तक्रारी त्या-त्या क्षेत्रातील कंपनीला पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी १६ हजार ७०० तक्रारींना एका महिन्यात प्रतिसाद देण्यात आला. जानेवारी महिन्यांत ४८० प्रकरणांमध्ये ग्राहकांनी आपल्या तक्रारींचे निवारण झाल्याचे संकेतस्थळावर पोस्ट केले आहेत, तर फेब्रुवारीत ५११ प्रकरणांमध्ये कंपन्यांकडून तक्रारी सोडविल्याचे म्हटले आहे.

अशी झाली तक्रारींची नोंद
राज्य जानेवारी फेब्रुवारी
उत्तर प्रदेश ४,९८३ ४९३३
दिल्ली ४५२० ४३४७
महाराष्ट्र ४२९८ ४०१३
राजस्थान ३३७४ २७९४
प. बंगाल २१६२ २३३७
(टक्केवारीत)
क्षेत्र जानेवारी फेब्रुवारी
ई-कॉर्मस १७ २०
दूरसंचार १५ १७
बँकिंग १० १३
कझ्युमर ५ ३
इलेक्ट्रॉनिक्स
एजन्सी सर्व्हिसेस ४ ४

Web Title: More than 68 thousand complaints in the National Consumer Helpline website in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.