आषाढी एकादशीनिमित्त 70 हजारांहून अधिक भाविकांनी घेतले पददर्शन
By Admin | Published: July 15, 2016 08:48 PM2016-07-15T20:48:03+5:302016-07-15T20:48:03+5:30
आषाढी एकादशीनिमित्त आज तब्बल सत्तर भाविकांनी घेतले.
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 15 - आषाढी एकादशीनिमित्त आज तब्बल सत्तर भाविकांनी घेतले. एका मिनिटाला सुमारे ४० ते ४८ भाविकांनी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून पुढे सरकत होते. त्याशिवाय मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आठ ते दहा लाखांवर गेली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात सुमारे पंधरा लाखांपेक्षा जास्त भाविक जमले असल्याचा अंदाज मंदिरसमिती आणि पोलिस प्रशासनने व्यक्त केला. गेल्या वर्षी साधारण चार ते पाचच्या दरम्यान मंदिराच्या परिसरातील गर्दी ओसरत असते त्यामुळे येथून चालायया जागा राहते मात्र आज रात्री आठ वाजले तरी या परिसरात भाविकांची इतकी गर्दी होती की अक्षरश: पाय ठेवण्यास जागा मिळत नव्हती. भाविकांना स्वत:हून चालण्याएवजी मागच्या रेट्यामुळेट अपोआप गर्दी पुढे ढकलली जात होती.
मुख्यमंत्री पूजा व नित्यपूजेसाठी काल रात्री ते पहाटे चार पर्यंत दर्शन बंद करण्यात आले होते. त्यासाठी दर्शनबारी विणगेल्लीतील स्काय वॉकच्या शेपटापासून तोडण्यात आली. तेथून पुढे भाविकांनी बारीला सुरवात केल्यामुळे पहाटे तीन पर्यंत बार गोपाळपूर इंजिनिअरींग कॉलेजपर्यंत पोचली होती. मात्र पहाटे दर्शन सुरु केल्यानंतर अतिशय वेगात भाविकांना गाभाऱ्यातून पुढे काढण्यात येत होते. त्यामुळे रात्री आठ पर्यंत दर्शन बारी ओसरत नऊव्या पत्राशेड ओलांडून साधारण वीस मिटर लांबपर्यंत गेली होती.
दुसरकीकडे मुखदर्शनाची बारीही सुमारे पाच किलोमिटर लांब पसरली होती. रात्री दर्शन बंद झाल्यानंतर मुखदर्शनाची बारी तुकाराम भवनला वेढा मारून त्याच्या पाठिमागील भाजीमंडईच्या बोळातून पुन्हा चौपाळा चौकाच्या कृष्ण मंदिरापर्यंत पुन्हा फिरून आली होती. ऐन प्रदक्षिमा मार्गावर ही मुखदर्सनाची रांग आल्याने ज्या दिंड्यांन पहाटेच प्रदक्षिणेला सुरवात केली त्यांला या बारीमुळे अडचणी निर्माण झाली होती.
----
पहाटे तीन पाच नंतहरी प्रभूंनी केली बारीची पाहणी
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा पहाटे दोन वीसला सुरू झाली त्याच्या आधीपासून बंदोबस्तात असलेले पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्याची पूजा संपल्यावर व गाड्यांचा ताफा रवाना झाल्यानंतर पुन्हा पहाटे पाच पर्यंत अवघी दर्शन बारी चालत फिरून पाहणी केली व ताटकळलेल्या भाविकांना आता रांग थांबणार नाही असा धीर देत त्यांच्यात चैतन्य निर्माण केले