चंद्रपुरात अधिक बालमृत्यू

By Admin | Published: July 18, 2016 04:36 AM2016-07-18T04:36:27+5:302016-07-18T04:36:27+5:30

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.

More death deaths in Chandrapur | चंद्रपुरात अधिक बालमृत्यू

चंद्रपुरात अधिक बालमृत्यू

googlenewsNext

मिलिंद कीर्ती,

चंद्रपूर- अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. २०१५-१६ या वर्षात मेळघाटमध्ये ४४६ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. तर, याच काळात चंद्रपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचा आकडा ४६५ वर गेला होता. यामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूंचा समावेश नाही.
मेळघाटप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही आदिवासी क्षेत्र असून तेथील बालके चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील एनआरसीमध्ये दाखल केली जात असतात. त्यामुळे एनआरसीमध्ये बालमृत्यू अधिक होत असल्याची नोंद झाली आहे. सर्वप्रथम १९९३मध्ये अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालमृत्यंूची भयावह स्थिती उघडकीस आली होती. परिणामी आदिवासी बालके व मातांच्या पोषणाकरिता सर्वाधिक शासकीय योजना मेळघाटमध्ये राबविण्यात आल्या. विविध प्रगतिशील संवर्धक योजनांमुळे मेळघाटात १०५० बालमृत्यूंची संख्या यावर्षी ४४६पर्यंत खाली आली आहे.
चंद्रपूर येथे २०१४-१५मध्ये ८१३ बालमृत्यू झाले होते. त्या वर्षी मेळघाटमध्ये ५१५ बालमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यापूर्वी २०१३-१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल १२६० तर मेळघाटात ६०० बालमृत्यूंची नोंद करण्यात आली. २०१२-१३मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ६९६ तर मेळघाटात ४०९ बालमृत्यू झाले होते.
शहरी क्षेत्राची नोंद अधिक
चंद्रपूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशी बालमृत्यूंची नोंद केली जाते. त्यामध्ये २०१५-१६मध्ये शहरी क्षेत्र २९३ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र १७२ बालमृत्यू, २०१४-१५मध्ये शहरी क्षेत्र ५७६ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २३७ बालमृत्यू, २०१३-१४मध्ये शहरी क्षेत्र ९९२ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २६८ बालमृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
मेळघाट आणि चंद्रपूर जिल्ह्याची तुलना करणार नाही. तेथील परिस्थिती आणि चंद्रपूरची परिस्थिती वेगळी आहे. आपण कुपोषणमुक्ती व बालमृत्यू नियंत्रणात चांगली प्रगती केली आहे. आपले प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., चंद्रपूर

Web Title: More death deaths in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.