कार्तिकीयात्रेसाठी पंढरपुरात चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

By admin | Published: November 10, 2016 09:23 PM2016-11-10T21:23:44+5:302016-11-10T21:23:44+5:30

सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन कार्तिकीयात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून एकूण चार लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

More than four lakh devotees file for Panditpur | कार्तिकीयात्रेसाठी पंढरपुरात चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

कार्तिकीयात्रेसाठी पंढरपुरात चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

Next

 ऑनलाइन लोकमत/ प्रभू पुजारी

पंढरपूर, दि.10 - सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन कार्तिकीयात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून एकूण चार लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. शुक्रवारी एकादशीचा मुख्य सोहळा असून विठूरायाचे दर्शन घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविक आतूर झाले आहेत़ श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील मंदिर समितीच्या पत्रा शेडच्या पुढे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या पत्राशेडपर्यंत गेली आहे. दर्शनासाठी भाविकांना सात ते आठ तास लागत आहेत.

आषाढीनंतरची मोठी कार्तिकी वारी असते़ या वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. आषाढी वारीला ज्यांना येणे शक्य झाले नाही ते भाविक या वारीला नक्कीच येतात़ त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीमुळे रस्त्यावरून ये-जा करणेही मुश्किल होते. चौक, बोळ, गल्लीच्या ठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे़ 
सध्या मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, चौक ही ठिकाणे गर्दीने फुलून गेली आहेत़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यासह अन्य मठातही भाविकांची वर्दळ आहे़ मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, किर्तनाचे सूर आळवले जात आहेत़ पंढरपुरात येणारा भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जात आहेत. दर्शनरांग गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत गेली असून, पदस्पर्श दर्शनासाठी सात ते आठ तास लागत आहेत.
 
वारीतील सोयी-सुविधा
पददर्शनासाठी गोपाळपूरपर्यंत दर्शन रांगेची सोय दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समिती आणि स्वयंसेवी संस्थेतर्फे मोफत चहा, पाण्याची सोय दर्शन रांगेत होणारी घुसखोरी, चोरी रोखण्यासाठी २४ तास चोख पोलीस बंदोबस्त
मंदिर समितीतर्फे ९० सीसीटीव्ही कॅमेºयातून संपूर्ण वारीवर नजर
नामदेव पायरी येथे एलईडी स्क्रीनद्वारे थेट दर्शन
मंदिर समितीच्या वतीने लॉकरची सोय
६५ एकर क्षेत्रांवर वारकºयांसाठी पाणी, वीज, रस्ते, औषधोपचार, स्वच्छतागृहांची सोय
पंढरपूर शहरात येणाºया विविध मार्गावर बॅरेगेट उभारून जड वाहनांना बंदी
वाखरी तळ येथे जनावरांच्या बाजाराची सोय
 
व्यवसायीकांनी थाटली दुकाने
यात्रेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, प्रदक्षिणा मार्गावर छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांनी दुकानात वस्तूंची आकर्षक मांडणी केली आहे. यात प्रासादिक वस्तू, फोटो फे्रम, देवदेवतांच्या तांब्या, पितळीच्या मूर्ती, तुळशीच्या माळा, विविध धार्मिक ग्रंथ, सीडी, कॅसेटचा समावेश आहे.

Web Title: More than four lakh devotees file for Panditpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.