पैसा, सत्ता जितकी एका हाती केंद्रीत होईल, तितकी त्याबदद्लची निश्चितता कमी- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 08:35 PM2022-02-25T20:35:09+5:302022-02-25T20:36:53+5:30
अर्थाची जी शक्ती, धनाची जी शक्ती आहे, ती काही हातात केंद्रीत होण्यापेक्षा ती हळहळू सर्वसामान्यांच्या हातात येईल यासाठी ही चळवळ असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ठाण्यात बोलतांना व्यक्त केले.
ठाणे: पैसा असो, सत्ता असो, ती जितकी एका हातात केंद्रीत होईल, तितकी त्या बद्दलची निश्चितता, कमी होते, वाईटच होईल असे नाही, चांगलेही होऊ शकते, ते करणा:यावर अवंलबून असते. परंतु म्हणून आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना विकेंद्रीत स्वरुपात सगळीकडे वाटायची आपल्याकडे परंपरा आहे. अर्थशक्ती करीता सुध्दा सहकार हा उपाय आहे. अर्थाची जी शक्ती, धनाची जी शक्ती आहे, ती काही हातात केंद्रीत होण्यापेक्षा ती हळहळू सर्वसामान्यांच्या हातात येईल यासाठी ही चळवळ असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ठाण्यात बोलतांना व्यक्त केले.
ठाण्यातील एका हॉटेलमध्ये टीजेएसबी सहकारी बॅंकेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समांरभासाठी भागवत हे ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी वरील विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास बॅंकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, उपाध्यक्ष शरद गांगल आणि व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे हे उपस्थित होते. संघाचे स्वंयसेवक सहकार क्षेत्रत का आले, बॅंकीग या विषयाकडे व्यवसाय म्हणून त्यांनी पाहिले नाही, सेवा म्हणून ते येथे आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भारतात सहकार हा खुप जुना आहे, सहकार ही गोष्ट ही भारतीयांच्या रक्तात आहे, प्राचीन काळापासून सुरु आहे. म्हणून प्रत्येक व्यवसाय करतांना त्या व्यावसयाशी संबधींत जेवढे व्यक्ती असतील ते कुटुंब म्हणून असते, शक्ती ही केंद्रीय झाली तर त्याचा चांगला उपगोय होऊ शकतो, परंतु त्याचा वाईट उपयोगही होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. अर्थ ही एक शक्ती आहे. तीला माणसाला भटकविण्याचे सामर्थ आहे, दिशा बदलविण्याचे समार्थ आहे, चांगल्या वाईटाकडेही ती नेऊ शकते असेही त्यांनी सांगितले. पैसा कशासाठी हवा, अर्थ पुरषार्थ आहे,. आपण लक्षीपुजन करणारे लोक आहोत, परंतु त्याचे अनुषसान धर्म आहे, आर्थिक उलाढाली का करायचा, पैसा का मिळवायचा समाज चालावा म्हणूनच या उलाढाली करायच्या असतात. विना सहकार नही उध्दार, परंतु संघाचे स्वयंसेवक आणखी एक वाक्य जोडत उरतले, या क्षेत्रत उतरले. विना सहकार नवी उध्दार, विना संस्कार नही सहकार, त्यामुळे सहकारा बरोबर संस्कार नसतील तर सावकर गेला आणि सहकार आला अशी म्हणायची पाळी ग्राहकांवर येते असेही त्यांनी सांगितले.
राज्याधिकार, अर्थाधिकार हे जितते सामान्य माणसाच्या हाती जातील तितके चांगले होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मी जनावरंचा डॉकटर आहे. सरकारी नोकरीचे तेरा महिने सोडले तर काही पैसा कमावला नसल्याचेही त्यांनी सांगितले. शेख अयाज या 8 वीच्या इयत्तेतील धडय़ाचा दाखला देत, तो फार कुशल, प्रामाणीक म्हणून तो राजाचा आवडता होता. राजकारणात देखील असे कोणी कोणाचे आवडते असले की मग, मत्सरी लोक असतातच, त्यांच्या कारवाया लगेच सुरु होतात, ते विग्रह करायचे प्रयत्न सुरु असतात. परंतु एवढय़ा मोठय़ा जागी गेल्यानंतरही ज्याची जाणीव असली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आपले मित्र कोण आहेत, खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ कसा आहे. मी कोण, माझी शक्ती काय, याचे चिंतन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. पूर्वी संघ प्रसिध्द नव्हता, परंतु आता काळ बदलला आहे, देशकालीन परिस्थिती बदले. त्यामुळे खरे मित्र असतात ते टिकतात, मात्र परिस्थिती नुसार देखील मित्र बदलतात. आपली परिस्थिती चांगली म्हणून येणारे मित्र असतात, तर काहींची परिस्थिती चांगली नाही, म्हणून सोडून जाणारे मित्रही असतात. परंतु हे तेवढ्यापुरती असते हे लक्षात ठेवा असेही त्यांनी सांगितले.
नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकष्यपचा वध केला. तेव्हा देवांनी पुष्पवृष्टी केली. तेव्हा देवांना वाटत होते, की राक्षस गेला म्हणजे देवांच्या हाती सत्ता येणार, परंतु ते नृसिंह भगवान प्रल्हादाकरीता आले होते, त्यांनी तो राज्यधिकारी प्रल्हादाला दिला. होते असे कधी कधी तिथे पोहचूनही दुसरेच कोणी तरी घेऊन जाते, असेही त्यांनी सांगितले. सचोटी नसतांना आपला कार्यभाग साधून घेणारे लोक असतात. परंतु ते दिर्घकाळ ते चालत नाही, शेवटी सत्याचाच जय होतो हे देखील तितकेच सत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्या महायुद्धाचा दाखला देत चर्चिला पक्षातूनही विरोध होता, त्याला अंहकार होता, त्यामुळे सर्वाचा विरोध होता, परंतु या आवडी निवडी बाजूला सारुन सर्वानी चर्चिला पद बहाल केल्याचेही त्यांनी सांगितले.