पोलीस भरतीत तोतयेगिरी करणारे आणखी तिघेजण गजाआड
By Admin | Published: May 1, 2016 01:21 AM2016-05-01T01:21:56+5:302016-05-01T01:21:56+5:30
तीनही आरोपी जालना जिल्हय़ातील.
अकोला: जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी 'डमी' उमेदवार उभा क रणार्या उमेदवारासह चौघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी २0 एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल करून राजू पहुरे, विठ्ठल सिसोदे व कल्याणसिंह बमनावत या तिघांना अटक केली. यातील फरार असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यांना ५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पडताळणी केल्यानंतर शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या औरंगाबाद जिल्हय़ातील जोडवाडी येथील रहिवासी राजू रामलाल पहुरे (२४) या उमेदवाराने शारीरीक चाचणी स्वत: दिली; मात्र लेखी परीक्षेला त्याने जालना जिलतील निहालसिंहवाडी येथील रहिवासी विठ्ठल त्र्यंबक सिसोदे (२२) हा बसला असल्याचे उघडकीस आले. अधिक चौकशीमध्ये राजू पहुरे व लेखी परीक्षा देणारा डमी उमेदवार सिसोदे यांच्यात जालना जिलतील निहालसिंहवाडी येथील कल्याणसिंह अंबरसिंह बमनावत व संदीप इंदर जाधव यांनी मध्यस्थी केल्याचे समोर आले. या दोघांच्या मध्यस्थीने राजू पहुरे याने विठ्ठल सिसोदे याला लेखी परीक्षा देण्यासाठी दोन लाख रुपये कबूल केले होते; मात्र पोलिसांच्या पडताळणीमध्ये त्याचा पर्दाफाश झाल्यानंतर राजू रामलाल पहुरे, विठ्ठल सिसोदे, कल्याणसिंह बमनावत व संदीप जाधव या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या तिघांना अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी फरार संदीप इंदल जाधव(२२) याच्यासह चंपालाल लालचंद बैनाडे(२२ रा. किनगाववाडी जि. जालना), युवराज प्रेमसिंग नार्हेडे(रा. नेहालसिंगवाडी जि. जालना) यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणाचा तपास स् थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, एपीआय प्रकाश झोडगे करीत आहेत.