परदेशी शिष्यवृत्ती आता अधिक विद्यार्थ्यांना
By admin | Published: September 28, 2016 01:30 AM2016-09-28T01:30:55+5:302016-09-28T01:30:55+5:30
परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारतर्फे दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असे. आता त्यात आणखी २५ची वाढ करून ७५ विद्यार्थ्यांना या योजनेचा
मुंबई : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारतर्फे दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असे. आता त्यात आणखी २५ची वाढ करून ७५ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिपरिषदेने आज घेतला. या विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणाची संधी मिळावी म्हणून सामाजिक न्याय विभागातर्फे सदर योजना चालविली जाते. (विशेष प्रतिनिधी)
भाडेपट्ट्यावरील जमिनींचे बाजारदरानुसार नूतनीकरण
शासनाने भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण बाजार मूल्यानुसार करण्याचा निर्णय झाला. भाडेकरार संपुष्टात आल्याच्या लगतच्या दिनांकापासून अस्तित्वात असलेल्या बाजारमूल्यानुसार
३० वर्षांसाठी आकारणी करूनच हे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
संस्थात्मक लवाद धोरण : विविध संस्थांच्या व्यावसायिक-वित्तीय तंट्यांच्या निवारणासाठी संस्थात्मक लवाद हे प्रभावी माध्यम ठरावे यासाठी संस्थात्मक लवाद धोरण राज्यास लागू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे अशा स्वरूपाचे तंटे निवारण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि पैसा वाचण्यास मदत मिळणार आहे. तसेच या क्षेत्रातील जास्तीचा न्यायालयीन हस्तक्षेपही कमी होण्यास मदत होणार आहे.