एफआरपी अधिक अडीचशेवर तडजोड शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:37 AM2017-10-30T03:37:13+5:302017-10-30T03:37:26+5:30

कर्नाटकातील दोन साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर केल्याने, महाराष्ट्रातील कारखान्यांना तेवढी उचल द्यावीच लागणार आहे.

More than thirty-five francs of FRP possible to compromise | एफआरपी अधिक अडीचशेवर तडजोड शक्य

एफआरपी अधिक अडीचशेवर तडजोड शक्य

Next

कोल्हापूर : कर्नाटकातील दोन साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर केल्याने, महाराष्ट्रातील कारखान्यांना तेवढी उचल द्यावीच लागणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३,४०० रुपये पहिली उचल मागितली असली, तरी त्यांनी त्यात लवचिकता ठेवली आहे. कोल्हापुरातील कारखान्यांची सरासरी एफआरपी प्रतिटन २,८०० रुपये आहे. त्यावर अडीचशे रुपये जादा देऊन तडजोड होऊ शकते, पण ही कोंडी फोडण्यासाठी सरकारच्या मध्यस्थीची गरज आहे.
यंदाचा गळीत हंगाम बुधवारपासून सुरू होत आहे. महिनाभर कर्नाटकातील हंगाम सुरू असल्याने सीमाभागातील साखर कारखानदार उसाच्या पळवापळवीमुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे कारखाने लवकर सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, शेतकरी संघटनांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटन ३,५००, खा. राजू शेट्टी यांनी ३,४००, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संघटनेने एफआरपी अधिक ३०० रुपये अशी पहिल्या उचलीची मागणी केली आहे. राज्य सरकारतर्फे गुरुवारी ऊस दराबाबत मुंबईत बैठक होणार आहे. पहिल्या बैठकीत फारशी चर्चा होईल, अशी शक्यता नाही.

खा. राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांबरोबरच सरकारलाही अंगावर घेतले आहे. त्यामुळे सरकार आपल्या ताकदीचा वापर करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोंडी करण्याची शक्यता आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुढे करून ते ऊसदराची कोंडी फोडून शेट्टींचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करणार, हे निश्चित आहे.

Web Title: More than thirty-five francs of FRP possible to compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.