संशोधनक्षेत्रत अधिक कार्य व्हावे

By admin | Published: August 9, 2014 02:49 AM2014-08-09T02:49:12+5:302014-08-09T02:49:12+5:30

काळाची गरज पाहता संशोधनक्षेत्रत अधिक कार्य झाले पाहिजे. असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले.

More work will be done in research area | संशोधनक्षेत्रत अधिक कार्य व्हावे

संशोधनक्षेत्रत अधिक कार्य व्हावे

Next
>मुंबई : काळाची गरज पाहता संशोधनक्षेत्रत अधिक कार्य झाले पाहिजे. विद्याथ्र्याना अधिकाधिक संशोधन करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले. गुरुतेगबहादूरनगर येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कलाम उपस्थित होते.
याप्रसंगी माजी राष्ट्रपती कलाम यांनी विद्याथ्र्याशी संवाद साधला. तुम्हीच देशाचे भविष्य आहात, असे सांगून त्यांच्याकडून भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याची शपथ त्यांनी घेतली. तसेच विद्याथ्र्याचा उत्साह वाढवण्यासाठी ‘विंग्ज ऑफ फ्लाय’ ही कविता त्यांनी वदवून घेतली. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, शिक्षणाच्या जोरावरच यशाचे शिखर गाठू शकता. याचबरोबर टीव्ही कमी पाहण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. टीव्ही पाहण्याचा वेळ कमी करून त्याऐवजी गुरुगं्रथ यांसारखे धार्मिक ग्रंथ वाचून ज्ञानात भर घालावी, असा उपदेशही त्यांनी दिला.
कलाम यांनी शिक्षकांना सांगितले, जे ज्ञान आपण विद्याथ्र्याना देतो ते स्वत:ही आत्मसात करावे. तसेच विद्याथ्र्यासमोर उभे राहून शिकवताना कोणतीही चूक होऊ देऊ नका. आजची पिढी ही फार हुशार आहे. त्यामुळे तुमची चूक लगेच पकडली जाते. कलाम यांनी विद्याथ्र्याकडून ‘मी करू शकतो, आपण करू शकतो, भारत करू शकेल’ असा नाराही वदवून घेतला.
समारंभाच्या अखेरीस त्यांनी विद्याथ्र्याकडून दहा शपथा ग्रहण करून घेतल्या. यात घरापासून संपूर्ण समाज भ्रष्टाचारमुक्त करणो, यंत्रणा पारदर्शक बनवणो, चांगला नागरिक बनणो, जीवनात मोठे लक्ष्य करून त्यासाठी जगणो यांचा समावेश होता. एका विद्याथ्र्याने कलाम यांना शैक्षणिक क्षेत्रत आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न केला. त्यावर कलाम म्हणाले, काही काळापूर्वी या आरक्षणाची गरज भासत होती. मात्र, आता जसे अभियांत्रिकी शाखेत जागा मोकळ्या राहत आहेत, त्याचप्रमाणो पुढील काळात वैद्यकीय आणि व्यवस्थापकीय क्षेत्रतसुद्धा ही परिस्थिती उद्भवणार आहे.
कार्यक्रमात रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. एम.एम शर्मा तसेच गुरुनानक विद्यक सोसायटीचे संचालक समितीचे अध्यक्ष सरदार मनजीतसिंग भट्टी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकर या वेळी उपस्थित होते. गुरुनानक महाविद्यालयाच्या नावाच्या पोस्टल कार्डचे डॉ. कलाम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: More work will be done in research area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.