या राज्यात खाल्ली जातात सर्वाधिक बिस्किटे
By admin | Published: February 26, 2017 06:51 PM2017-02-26T18:51:24+5:302017-02-26T18:51:24+5:30
बिस्किट हा पदार्थ मात्र गेल्या काही वर्षात देशातील घराघरात पोहोचला आहे. भारतीय वर्षाकाठी तब्बल
Next
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 26 - विविधता असलेल्या आपल्या देशात खानपानाच्याही विविध पद्धती आहेत. राज्य प्रांतानुसार त्यात बदल होत असतो. पण बिस्किट हा पदार्थ मात्र गेल्या काही वर्षात देशातील घराघरात पोहोचला आहे. भारतीय वर्षाकाठी तब्बल 36 लाख टन बिस्किटे फस्त करतात, असे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राने सर्वाधिक बिस्किटे खाणाऱ्यांमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. महाराष्ट्रीयन वर्षाला तब्बल 1 लाख 90 हजार टन बिस्किटे खातात, असे ही आकडेवारी सांगते.
बिस्किट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार देशात गतवर्षी 36 लाख टन बिस्किटांची विक्री झाली. बिस्किटांच्या विक्रीत दरवर्षी आठ ते दहा टक्क्यांनी वाढ होत असून, दरवर्षी देशभरात तब्बल 37 हजार 500 कोटींची बिस्कीटे विकली जातात. यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे.
याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष हरेश दोषी यांनी सांगितले की आता लोक केवळ चवीसाठी नव्हे तर नाश्ता, आरोग्यसंबंधी कारणे आणि जेवणाच्या जागीही बिस्कीटे खावू लागले आहेत. त्यामुळे बिस्किटांची मागणी सातत्याने वाढत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात केवळ ग्लुकोज बिस्किटे होती. मात्र आता वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे बाजारात आली आहेत. बिस्किटे खाणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा नंबर लागतो. तेथे वर्षाला 1 लाख 85 हजार टन बिस्किटे खाल्ली जातात. तर तामिळनाडूमध्ये एक लाख 11 हजार, पश्चिम बंगालमध्ये एक लाख दोन हजार तर कर्नाटकात 93 हजार टन बिस्किटे खाल्ली जातात. तर पंजाब आणि हरयाणात सर्वात कमी प्रमाणावर बिस्किटे खाल्ली जातात.