महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक बोगस पॅन
By admin | Published: May 3, 2016 01:40 AM2016-05-03T01:40:27+5:302016-05-03T01:40:27+5:30
एकाच वेळी दोन पॅन कार्ड बाळगणे आणि इतर कारणांमुळे सरकारने ११.५६ लाखापेक्षा जास्त परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) हटविले आहेत. हटविण्यात आलेल्या पॅन नंबरमध्ये सर्वाधिक
- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
एकाच वेळी दोन पॅन कार्ड बाळगणे आणि इतर कारणांमुळे सरकारने ११.५६ लाखापेक्षा जास्त परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) हटविले आहेत. हटविण्यात आलेल्या पॅन नंबरमध्ये सर्वाधिक महाराष्ट्र आणि दिल्लीतील आहेत.
डुप्लीकेट पॅन नंबर ओळखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्मार्ट प्लॅटफॉर्मबाबत विचारलेल्या
एका प्रश्नाच्या उत्तरात वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले, आयकर विभागाने कामकाजासाठी व्यापक स्तरावर इन्कमटॅक्स बिझनेस अप्लीकेशन (आयटीबीए) टप्प्याटप्प्याने सुरू केले आहे. पॅनदेखील त्याचाच एक भाग आहे.
आयटीबीए-पॅनमुळे पॅन कार्डमध्ये केलेला कोणताही बदल आणि डुुप्लीकेट पॅनचा शोध घेता येतो. याशिवाय नकली पॅन नंबर ओळखण्यासाठी नव्या सॉफ्टवेअरमध्ये संदिग्ध पॅन अर्जदाराचे स्कॅन केलेले छायाचित्र प्रदर्शित केले जाईल, ज्यामुळे अस्सल व बोगस पॅनची ओळख पटेल.