महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:28 AM2017-12-02T05:28:03+5:302017-12-02T05:28:22+5:30

भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.

  Most corruption in Maharashtra | महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार

महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार

Next

मुंबई : भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.
नॅॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, महाराष्टÑ २०१५ व २०१४मध्येदेखील आघाडीवर होता. मात्र, त्या वेळी अनुक्रमे १,२७९ व १,३१६ प्रकरणे समोर आली होती. त्यानुसार प्रकरणे कमी होत असल्याचा ट्रेण्ड दिसून येत असून, तीच एक सकारात्मक बाब मानली जात आहे. महाराष्टÑानंतर या श्रेणीत दुसरा क्रमांक ओडिशाचा आहे. मात्र तेथील प्रकरणांची संख्या फक्त ५६९ आहे.
भ्रष्टाचाराची २०१६मध्ये सर्वाधिक १८५ प्रकरणे सांस्कृतिक राजधानी पुण्यात समोर आली आहेत. नाशकात १५३, नागपुरात १३५, ठाणे व औरंगाबाद प्रत्येकी १२०, अमरावतीत ११० व नांदेडातील १०३ प्रकरणांचा समावेश आहे. सर्वांत कमी ५० प्रकरणे मुंबईतील आहेत.

तिस-यांदा अव्वल 
गुन्ह्यांचा विचार केल्यास यात देशाची राजधानी दिल्लीच आघाडीवर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही बंगळुरूनंतर तिसºया स्थानी आहे. सन २०१६मध्ये मुंबईत ३९ हजार ६१७ गुन्ह्यांची नोंद झाली. मात्र हा आकडा २०१५च्या ४२ हजार ९४०च्या तुलनेत कमी झाल्याची सकारात्मक नोंद अहवालात आहे.

 

Web Title:   Most corruption in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.