ज्येष्ठ समाजसेवक अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य; गिरीश महाजनांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:11 PM2019-02-03T17:11:49+5:302019-02-03T17:37:45+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा-या मागण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. लवकरत त्याही मागण्या मान्य होतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
राळेगणसिध्दी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा-या मागण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. लवकरत त्याही मागण्या मान्य होतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. राज्य सरकारच्यावतीने अण्णांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन राळेगणसिद्धीत आले होते. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत.
केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा-या मागण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. लवकरत त्याही मागण्या मान्य होतील. तसेच, अण्णांचे वय जास्त असल्यामुळे उपोषण सोडणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन उपोषण सोडण्याची विनंती अण्णांना करावी, असे आवाहन महाजन यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.
महाजन म्हणाले, मागण्यांसदर्भात अण्णांशी वारंवार चर्चा झाली आहे. लोकायुक्तच्या बाबतीत नुकताच मंत्रिमंडळात मंजुरी दिली. शेतक-यांना मदत आता मिळणार आहे. मजुरांनाही आता पेन्शन मिळणार आहे. 100 टक्के सबसिडी ठिबक सिंचनासाठी मिळणार आहे. शेतीमालाच्या हमीभावाच्या बाजारभावात वाढ करण्यात आली आहे. उद्या मुख्यमंत्री व पंतप्रधानाचे पत्र घेऊन मी पुन्हा येणार आहे, असेही महाजन म्हणाले.