अवकाळीच्या कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:06 AM2019-10-29T00:06:45+5:302019-10-29T06:29:30+5:30

कडपा ओल्या झाल्याने पीक जाणार : कृषी विभागाचे सर्वेक्षणाचे आदेश, पीक विम्याची मदत होणार

Most hit on prematurely harvested paddy | अवकाळीच्या कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका

अवकाळीच्या कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका

Next

गोंदिया : जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीपातील कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका बसला. बांध्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमवावे लागणार आहे. सोमवारी (दि.२८) सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे खरीपातील धान पिकांवर अवकाळी पावसाचे सावट कायम असल्याचे चित्र आहे.

धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडत असल्याने ऐवढा पाऊस धानपिकासाठी अनुकुल मानला जातो.त्यामुळे धान हेच या भागातील मुख्य पीक आहे.यंदा सुरूवातीला पाऊस लांबला होता. मात्र जुलैनंतर पावसाने सरासरी गाठल्याने धान पिकाची चांगली वाढ झाली. त्यामुळे कृषी विभागाने सुध्दा बंफर धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. दिवाळीपूर्वी हलका धान निघतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण्यास आणि उधार उसणवारी फेडण्यास मदत होते. जिल्ह्यातील बºयाच शेतकºयांना पंधरा ते वीस दिवसांपूर्वीपासून हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली होती. कापणी केलेल्या धानाच्या कडपा तश्याच बांध्यामध्ये पडून होत्या. मात्र मागील आठवड्यात आणि शनिवारी व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्या. काही भागात बांध्यामध्ये पाणी साचल्याने धान सडला. त्यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे धान पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व तालुका कृषी अधिकाºयांना दिले आहे. त्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे १० ते १५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा कापणी केलेला धानाला बसला आहे.त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या धान पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व तालुका कृषी अधिकाºयांना दिले आहे. याची माहिती पीक विमा कंपन्याना सुध्दा दिली आहे. - नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया.

पीक विमाधारक शेतकºयांना मिळणार नुकसान भरपाई
पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत यंदा जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांनी पीक विमा काढला. विमा कपनीच्या तरतूदीनुसार ज्या पीक विमाधारक शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल त्यांना शासनाकडून पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आहे.

ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांचा धोका
मागील चार पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.तर काही भागात अवकाळी पाऊस सुध्दा झाला. ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवरील किडरोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हाती आलेले पीक तर गमवावे लागणार नाही ना अशी भिती शेतकºयांना सतावित आहे.

Web Title: Most hit on prematurely harvested paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस