भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 05:53 AM2024-10-21T05:53:50+5:302024-10-21T05:54:46+5:30

बावनकुळे यांना कामठीतून उमेदवारी, लोकसभेत पराभूत झालेल्यांना संधी, १३ महिलांनाही मिळाली उमेदवारी

Most of the old faces get a chance in the first list of BJP; All ten ministers along with Fadnavis are in the field | भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात

भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करून बाजी मारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व १० मंत्र्यांना व विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली. आमदारांना मोठ्या प्रमाणात डच्चू मिळणार अशी चर्चा असताना जुन्या शिलेदारांवर विश्वास टाकण्यात आल्याचे पहिल्या यादीवरून दिसते. १३ महिलांनाही संधी देण्यात आली आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांमध्ये अनेक विद्यमान आमदारांचा तेथील विधानसभा निवडणुकीत भाजपने पत्ता कापला होता आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवत धक्कातंत्राचा वापर केला जाईल, अशी चर्चा होती पण आजी-माजी मंत्र्यांसह विधानसभेत सातत्याने भाजपचे प्रतिनिधीत्व करत आलेले अनेक चेहरे यादीत आहेत. भाजपने विद्यमान १७ आमदारांच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे.

२९ मंत्री असलेल्या महायुती त्या सरकारमध्ये भाजपचे १० मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या राजकारणात पाठविणार या चर्चेला त्यांना भाजपचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा म्हणून समोर करत आधीच पक्षनेतृत्वाकडून उत्तर देण्यात आले होते. त्यांना दक्षिण-पश्चिम नागपुरातून उमेदवारी देत या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे.

तीनपेक्षा अधिक वेळा आमदार- २०१४ ते २०१९ मधील फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, डॉ. संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावल, मदन येरावार, अशोक उइके, विद्या ठाकूर, विजयकुमार देशमुख यांनाही पुन्हा मैदानात उतरविण्यात आले आहे.

चार आमदाराच्या नातेवाइकांना संधी

- पुणे जिल्ह्यातील चिंचवडचे माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी विद्यमान आमदार अश्विनी जगपात यांच्याऐवजी त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झाल्याने त्यांचा मुलगा अमोल जावळे, कल्याण पूर्वचे तुरुंगात असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या जागी पत्नी सुलभा गायकवाड, श्रीगोंदाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिले आहे.

कोणत्या विभागातून किती उमेदवार?

विदर्भ २३, उत्तर महाराष्ट्र - १९, मराठवाडा १६, पश्चिम महाराष्ट्र १६, मुंबई १४, ठाणे - ७, पालघर- १, रायगड २, कोकण - १

बावनकुळेंसाठी सावरकरांचा पत्ता कट

■ प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांची विधानसभेची गाडी २०१९ मध्ये हुकली होती. त्यावेळी बरेच मोठे नाट्य घडले. त्यांच्या पत्नीला उमेदवारी अर्ज भरायला सांगितले पण नंतर त्यांनाही नकार देण्यात आला.

■ बावनकुळे यांनी त्यावेळी कोणाच्याही विरोधात प्रतिक्रिया दिली नाही. नंतर ते प्रदेश सरचिटणीस, विधान परिषद आमदार आणि नंतर प्रदेशाध्यक्ष नाले. त्यांना कामठीतून संधी देताना विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना अर्थातच संधी नाकारण्यात आली.

भाजपाची पहिली यादी-

मतदारसंघ    उमेदवार    विश्लेषण

  1. नागपूर दक्षिण प.    देवेंद्र फडणवीस           
  2. कामठी     चंद्रशेखर बावनकुळे       
  3. शहादा     राजेश पाडवी      
  4. नंदुरबार     विजयकुमार गावित       
  5. धुळे शहर     अनुप अग्रवाल      
  6. सिंदखेडा     जयकुमार रावल     
  7. शिरपूर     काशीराम पावरा      
  8. रावेर     अमोल जावळे      
  9. भुसावळ     संजय सावकारे      
  10. जळगाव शहर     सुरेश भोळे     
  11. चाळीसगाव     मंगेश चव्हाण     
  12. जामनेर     गिरीश महाजन     
  13. चिखली     श्वेता महाले       
  14. खामगाव     आकाश फुंडकर     
  15. जळगाव (जामोद)     संजय कुटे     
  16. अकोला पूर्व     रणधीर सावरकर     
  17. धामगाव रेल्वे     प्रताप अडसड     
  18. अचलपूर     प्रवीण तायडे         
  19. देवळी     राजेश बकाने       
  20. हिंगणघाट     समीर कुणावार     
  21. वर्धा     पंकज भोयर     
  22. हिंगणा     समीर मेघे     
  23. नागपूर दक्षिण     मोहन मते     
  24. नागपूर पूर्व     कृष्ण खोपडे     
  25. तिरोरा     विजय रहांगडाले     
  26. गोंदिया     विनोद अग्रवाल      
  27. आमगाव     संजय पुरम      
  28. आरमोरी      कृष्णा गजबे      
  29. बल्लारपूर     सुधीर मुनगंटीवार       
  30. चिमूर     बंटी भांगडिया     
  31. वणी     संजीवरेड्डी बोडकुरवार     
  32. राळेगाव     अशोक उइके     
  33. यवतमाळ     मदन येरावर     
  34. किनवट     भीमराव केरम     
  35. भोकर     श्रीजया चव्हाण       
  36. नायगाव     राजेश पवार     
  37. मुखेड     तुषार राठोड     
  38. हिंगोली     तानाजी मुटकुळे     
  39. जिंतूर     मेघना बोर्डीकर      
  40. परतूर     बबनराव लोणीकर     
  41. बदनापूर     नारायण कुचे       
  42. भोकरदन     संतोष दानवे     
  43. फुलंब्री     अनुराधा चव्हाण       
  44. औरंगाबाद पूर्व     अतुल सावे      
  45. गंगापूर     प्रशांत बंब     
  46. बागलाण     दिलीप बोरसे      
  47. चांदवड     राहुल अहेर     
  48. नाशिक पूर्व     राहुल ढिकले     
  49. नाशिक पश्चिम     सीमा हिरे      
  50. नालासोपारा     राजन नाईक       
  51. भिवंडी पश्चिम     महेश चौघुले     
  52. मुरबाड     किसन कथोरे     
  53. कल्याण पूर्व     सुलभा गायकवाड      
  54. डोंबिवली     रवींद्र चव्हाण      
  55. ठाणे     संजय केळकर     
  56. ऐरोली     गणेश नाईक     
  57. बेलापूर     मंदा म्हात्रे      
  58. दहीसर     मनीषा चौधरी      
  59. मुलुंड     मिहिर कोटेचा      
  60. कांदिवली पूर्व     अतुल भातखळकर     
  61. चारकोप     योगेश सागर     
  62. मालाड पश्चिम     विनोद शेलार      
  63. गोरेगाव     विद्या ठाकूर      
  64. अंधेरी पश्चिम     अमित साटम     
  65. विले पार्ले     पराग अळवणी     
  66. घाटकोपर पश्चिम     राम कदम     
  67. वांद्रे पश्चिम     आशिष शेलार     
  68. सायन कोळीवाडा    तमिल सेल्वन     
  69. वडाळा     कालिदास कोळंबकर     
  70. मलबार हिल     मंगलप्रभात लोढा       
  71. कुलाबा     राहुल नार्वेकर     
  72. पनवेल     प्रशांत ठाकूर     
  73. उरण     महेश बालदी      
  74. दौंड    राहुल कूल     
  75. चिंचवड     शंकर जगताप      
  76. भोसरी     महेश लांडगे     
  77. शिवाजीनगर     सिद्धार्थ शिरोळे     
  78. कोथरूड     चंद्रकांत पाटील       
  79. पर्वती     माधुरी मिसाळ      
  80. शिर्डी     राधाकृष्ण विखे पाटील       
  81. शेवगाव     मोनिका राजळे      
  82. राहुरी     शिवाजीराव कर्डिले     
  83. श्रीगोंदा     प्रतिभा पाचपुते       
  84. कर्जत-जामखेड     राम शिंदे      
  85. केज     नमिता मुंदडा       
  86. निलंगा    संभाजी पाटील निलंगेकर     
  87. औसा     अभिमन्यू पवार     
  88. तुळजापूर     राणा जगजितसिंह पाटील     
  89. सोलापूर शहर उत्तर    विजयकुमार देशमुख     
  90. अक्कलकोट     सचिन कल्याणशेट्टी    
  91. सोलापूर दक्षिण     सुभाष देशमुख     
  92. माण     जयकुमार गोरे     
  93. कराड दक्षिण     अतुल भोसले     
  94. सातारा     शिवेंद्रराजे भोसले     
  95. कणकवली     नितेश राणे     
  96. कोल्हापूर दक्षिण     अमल महाडिक     
  97. इचलकरंजी     राहुल आवाडे      
  98. मिरज     सुरेश खाडे       
  99. सांगली     सुधीर गाडगीळ

Web Title: Most of the old faces get a chance in the first list of BJP; All ten ministers along with Fadnavis are in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.