धनकवडीमध्ये सर्वाधिक अदलाबदली

By Admin | Published: January 18, 2017 01:22 AM2017-01-18T01:22:07+5:302017-01-18T01:22:07+5:30

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर एकूण ९०९ हरकती नोंदविण्यात आल्या.

Most swap in Dhankawadi | धनकवडीमध्ये सर्वाधिक अदलाबदली

धनकवडीमध्ये सर्वाधिक अदलाबदली

googlenewsNext


पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर एकूण ९०९ हरकती नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये सर्वाधिक ३०७ इतक्या मतदारांच्या अदला-बदली झाल्याच्या हरकती आल्या आहेत. सर्वात कमी २२ हरकती घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभागामध्ये आल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आली होती, त्यावर हरकत नोंदविण्याची मंगळवार ही शेवटची मुदत होती. प्रभागरचनेप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्या बनवितानाही राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ९०९ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत.
निवडणूक कार्यालयनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली. औंध ३१, घोले रोड २२, कोथरूड १०५, वारजे-कर्वेनगर ४९, ढोलेपाटील रस्ता २७, येरवडा १३, वडगावशेरी ५२, भवानी पेठ २४, कसबा-विश्रामबागवाडा ३६, टिळक रोड ५२, सहकारनगर ३३, बिबवेवाडी ५१, धनकवडी ३०७, कोंढवा-वानवडी ३०७, हडपसर ४० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयादीच्या आधारे प्रभागनिहाय याद्या यापूर्वीच प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १ जानेवारी २०१७ पर्यंत वयाची अठरा वर्षे पूर्ण होत असलेल्या तरुण-तरुणींच्या तसेच नवमतदारांची नावांची पुरवणी यादींसह पुन्हा प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर हरकती नोंदविल्या आल्या आहेत.
>याद्या करताना नाही योग्य काळजी
स्वारगेट येथील नाईक बी-बियाणे केंद्र, सेवा मित्रमंडळाचा भाग हा प्रभाग क्रमांक १५ मध्ये येत असताना तो प्रभाग १८ मध्ये दाखविण्यात आला. त्याचबरोबर सोन्यामारुती परिसरातील काही भाग प्रभाग १७ मध्ये येत असताना प्रभाग १८ मध्ये समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार ऋषी बालगुडे यांनी केली आहे. येरवड्याच्या व्हाइट हाऊस सोसायटीचा परिसर, तसेच रामवाडीचा काही भाग प्रभाग ५ मध्ये येत नसतानाही तो जोडण्यात आल्याची तक्रार आशिष माने यांनी केली आहे. प्रभागनिहाय याद्या करताना प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली गेली नसल्याचे या तक्रारींवरून स्पष्ट होत आहे.

Web Title: Most swap in Dhankawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.