...ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल; ध्येयवाद अन् महत्त्वाकांक्षेतील संघर्षाचा वेदनादायी शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 02:08 AM2020-12-01T02:08:38+5:302020-12-01T07:31:49+5:30

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या, आनंदवनातील अंतर्गत वाद अनेकदा पोलिसात गेला. मात्र कुठलीही कारवाई नाही. डाॅ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावरून महारोगी सेवा समितीवर केलेल्या आरोपाचे २२ नोव्हेंबर रोजी आमटे कुटुंबीयांकडून जाहीर खंडन

... This is the most unfortunate consequence; The painful end of the struggle between heroism and ambition | ...ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल; ध्येयवाद अन् महत्त्वाकांक्षेतील संघर्षाचा वेदनादायी शेवट

...ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल; ध्येयवाद अन् महत्त्वाकांक्षेतील संघर्षाचा वेदनादायी शेवट

Next

राजेश भोजेकर

चंद्रपूर : समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या जखमांवर मायेची फुंकर घालणाऱ्या बाबा आमटे यांच्या आनंदवनात नैराश्येपोटी कधी कुण्या कुष्ठरोग्याने आत्महत्या केली नाही. मग, बाबा व ताईंची नात, डाॅ. विकास व भारती आमटे यांची उच्चशिक्षित कन्या डाॅ शीतल 
यांनीच हे टोकाचे पाऊल का उचलले? गेल्या काही वर्षांमधील घटनाक्रम पाहता जुन्या पिढीने मोठ्या परिश्रमाने जपलेला ध्येयवाद आणि नव्या पिढीच्या महत्त्वाकांक्षा यांच्यातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्षाची ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल. 

  • गौतम करजगींसोबत विवाह झाल्यानंतर दोघेही काही काळ परदेशात होते.
  • सन २०११-१२ मध्ये डाॅ. शीतल आमटे-करजगी आनंदवनात आल्या.
  • २०१४-१५ मध्ये पती गौतम करजगीसुद्धा आनंदवनात आले.
  • डाॅ. शीतल शिक्षण व पर्यावरणावर काम करायच्या. त्यांना पेंटिंग्जचा छंद होता.
  • २०१७ मध्ये त्या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या.
  • २०१८ पासून पती गौतम करजगी यांच्याकडे आनंदवनच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी.
  • १७ ऑक्टोबर २०१९ रोजी संस्थेच्या सेवा कार्यात वर्तन विसंगत असल्याबाबत राजू सावसाकडे यांना महारोगी सेवा समितीचे घर खाली करण्याबाबत नोटीस. यावरून उभयतांमध्ये आरोप- प्रत्यारोप.
  • लाॅकडाऊनच्या काळात डाॅ. शीतल आमटे-करजगी यांची आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांची पत्नी पल्लवी व मुलीसह आनंदवनातून बाहेर पडले. ते पुन्हा परतले नाही. कालांतराने डाॅ. विकास आमटे यांनीही आनंदवन सोडले.
  • आनंदवनातील अंतर्गत वाद अनेकदा पोलिसात गेला. मात्र कुठलीही कारवाई नाही. डाॅ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावरून महारोगी सेवा समितीवर केलेल्या आरोपाचे २२ नोव्हेंबर रोजी आमटे कुटुंबीयांकडून जाहीर खंडन.
  • आनंदवनातील अंतर्गत वाद आणि कौटुंबिक वादातून डाॅ. शीतल आमटे एकाकी पडल्या होत्या. यातून नैराश्य आल्याचा अंदाज.

 

Web Title: ... This is the most unfortunate consequence; The painful end of the struggle between heroism and ambition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.