आत्महत्यांमध्ये सर्वाधिक वापर कीटकनाशकांचा

By admin | Published: July 8, 2015 02:08 AM2015-07-08T02:08:16+5:302015-07-08T02:08:16+5:30

विदर्भात गेल्या कॅलेंडर वर्षात आत्महत्या वा विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूंपैकी ६४ टक्के प्रकरणांत कीटकनाशकांचे सेवन झाल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

Most use of pesticides in suicides | आत्महत्यांमध्ये सर्वाधिक वापर कीटकनाशकांचा

आत्महत्यांमध्ये सर्वाधिक वापर कीटकनाशकांचा

Next

विदर्भातील वास्तव
डिप्पी वांकाणी, मुंबई
विदर्भात गेल्या कॅलेंडर वर्षात आत्महत्या वा विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूंपैकी ६४ टक्के प्रकरणांत कीटकनाशकांचे सेवन झाल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये विदर्भात झालेल्या मृत्यूंचे विश्लेषण करणाऱ्या तिघा संशोधकांनी ही आकडेवारी वर्ल्ड जर्नल आॅफ फार्मसी अँड फार्मास्युटिकल सायन्सेसच्या जून २०१५च्या आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केली आहे.
कीटकनाशक खाऊन सर्वाधिक मृत्यू (७३.७३ टक्के) यवतमाळमध्ये झाले आहेत. २०१४ मध्ये झालेले ११,७४८ मृत्यू हे विषामुळे झालेले असावेत, असा संशय चौकशी करणाऱ्या यंत्रणांना होता. मग हे प्रकरण फॉरेन्सिक्स सायंटिफिक लॅबोरेटरीकडे देण्यात आले. त्या अभ्यासातून हे निष्कर्ष निघाले आहेत. विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने कीटकनाशक सहज उपलब्ध होते. कीटकनाशकातील विषारी घटक आत्महत्या करणाऱ्यांच्या पोटात आढळल्याचे फॉरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरीचे संशोधक नितीन चुटके यांनी सांगितले. 

Web Title: Most use of pesticides in suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.