मोस्ट वॉंटेड गुन्हेगार आप्पा माने कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 PM2021-03-25T16:15:34+5:302021-03-25T16:34:14+5:30

Crimenews Kolhapur-पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथील सुमारे २० गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला ट्रिपल मोका कारवाईतील कुख्यात फरारी गुन्हेगार आप्पा उर्फ सुभाष ज्ञानदेव माने (वय ३२ रा. तामशेतवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याचा फरारी साथीदार पप्पु उर्फ सुहास किसन सोनवलकर (३० रा. वडले, ता. फलटण, जि. सातारा) यांलाही अटक केली.

Most wanted criminal Appa Mane in Kolhapur police net | मोस्ट वॉंटेड गुन्हेगार आप्पा माने कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात

पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथे गंभीर गुन्ह्यातील कुख्यात फरारी गुन्हेगार आप्पा उर्फ सुभाष माने व पप्पु उर्फ सुहास सोनवलकर यांना कोल्हापूरात अटक केली.

googlenewsNext
ठळक मुद्देट्रिपल मोका कारवाईत फरार : साथीदारही अटक ; दोन पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्तपश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथे गुन्हे

तानाजी पोवार 

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह नवी मुंबई, उस्मानाबाद येथील सुमारे २० गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला ट्रिपल मोका कारवाईतील कुख्यात फरारी गुन्हेगार आप्पा उर्फ सुभाष ज्ञानदेव माने (वय ३२ रा. तामशेतवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याचा फरारी साथीदार पप्पु उर्फ सुहास किसन सोनवलकर (३० रा. वडले, ता. फलटण, जि. सातारा) यांलाही अटक केली.

दोघा संशयितांच्याकडे कमरेला राऊंडसह लोड असलेले दोन पिस्टल, २० जिवंत राऊंड आदी शस्त्रसाठा जप्त केला. आरोपींच्यावर विवीध पोलिसांत दरोडा, रॉबरी, खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बुधवारी सायंकाळी शिवाजी विद्यापीठ, शाहु टोल नाका परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने तसेच राखील पोलीस दलाच्या मदतीने ही नियोजनबद्द कारवाई केली, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास व राखीव पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पथकाला ३५ हजार रुपयेचे बक्षीस जाहीर केले. संशयीतांनी बेळगाव (कर्नाटक)नजीक एका ज्वेलरी दुकानावर दरोड्याबाबत त्यांनी रेकी केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 

Web Title: Most wanted criminal Appa Mane in Kolhapur police net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.